तुमच्या रेशन कार्डची ई-केवायसी पूर्ण झाली आहे का? नसेल केली तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल..

Ration Card e-KYC: जर तुम्ही अजूनही तुमच्या रेशन कार्डची ई केवायसी पूर्ण केली नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. शिधापत्रिका धारकांसाठी शिधावाटप विभागाकडून इ केवायसी करण्याबाबत वारंवार आवाहन करूनही अनेक नागरिकांनी अजूनही ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. यामुळे आता त्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुदत उलटूनही केवायसी न केलेल्या रेशनकार्डधारकांना आता बोगस रेशन कार्ड धारक यादीमध्ये टाकले जाण्याची शक्यता आहे.

ई केवायसी न केलेले लाभार्थी अपात्र ठरू शकता

ज्या लाभार्थ्यांनी अजून रेशन कार्ड ची इ केवायसी पूर्ण केली नाही त्यांना मेरा रेशन ॲप द्वारे किंवा रेशन कार्ड च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे सांगितले जात आहे. मात्र याकडे अनेक लोकांनी गांभीर्याने लक्ष न दिल्याने आणि केवायसी पूर्ण न केल्यामुळे संबंधित लाभार्थ्यांना बोगस ठरवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर तुम्ही देखील केवायसी केली नसेल तर ही तुमच्यासाठी चिंतेची बाब असू शकते. कारण यामुळे तुम्हाला मोफत किंवा सवलतीच्या दरात धान्य त्यासोबत रेशन कार्डद्वारे मिळणाऱ्या इतर योजनेपासून वंचित राहावे लागू शकते.

हे पण वाचा| मराठवाड्यातील या जिल्ह्यांना खबरदारीचा इशारा; हवामान खात्याचा नवीन अंदाज पहा

सरकारने ई केवायसी पूर्ण करण्यासाठी निर्धारित केलेले मुदत आता संपली आहे. पण चांगली बातमी अशी आहे की, ज्या लाभार्थ्यांची केवायसी अजूनही बाकी आहे त्यांना ई पॉस मशीन किंवा मेरा रेशन च्या मदतीने अजूनही प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी दिली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही जर अजून ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर वेळ वाया न घालता लगेच ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या. यामुळे भविष्यात येणाऱ्या अडचणींना टाळता येईल. Ration Card e-KYC

रेशनचे धान्य विकल्यास शिधापत्रिका बंद होणार

केवळ केवायसीत नाही तर रेशनिंग विभागाकडून मिळालेले मोफत आणि सवलतीचे धान्य योग्य पद्धतीने वापरणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. हे धान्य लाभार्थी कुटुंबाने वापरणे देखील महत्त्वाचे आहे. जर हे धान्य विकल्यास संबंधित शिधापत्रिकाधारकांवर कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर त्या शिधापत्रिका धारकाची शिधापत्रिका रद्द करण्याची प्रक्रिया देखील होऊ शकते. त्यामुळे या नियमाचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!