Rashi News : गावाकडं जून महिना म्हणजे शेतीच्या तयारीचा काळ. आभाळाकडं डोळे लावून बसलेला शेतकरी, शाळा सुरू होणाऱ्या लेकरांच्या खरेदीची धावपळ, आणि घरातल्या मोठ्यांच्या मनात चाललेली चिंता या सगळ्या पार्श्वभूमीवर एक वेगळीच गोष्ट घडतेय. कारण 18 जूनपासून सुरू झालेला एक ग्रहण योग काही राशींना जोरदार फटका देणार असल्याचं जाणकार सांगतायत.
चंद्र आणि राहू या दोन शक्तिशाली ग्रहांचा कुंभ राशीत झालेला संयोग, म्हणजे मानसिक अस्थिरता, वैयक्तिक तणाव, नातेसंबंधांमध्ये फाटाफूट आणि आरोग्याच्या कुरबुरींचं निमित्त. ही बाब हलकं घेण्यासारखी नाही. याचा मोठा परिणाम पुढील ५ राशींवर होणार असल्याचं ज्योतिषशास्त्र सांगतंय. या राशींनी आता अगदी सावध राहण्याची वेळ आहे. Rashi News
कर्क (Cancer)
कर्क राशीच्या लोकांचं मन हळवं असतं. पण आता तेच मन संभ्रमात गुंतून जाण्याची शक्यता आहे. घरात वडीलधाऱ्यांशी किंवा जोडीदाराशी उगाचच वाद होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी वागण्यात अडचण येईल. पोटाशी संबंधित त्रास, अस्वस्थपणा जाणवेल. आर्थिक व्यवहार करताना पुराव्याशिवाय पावलं टाकू नका, फसवणुकीचा धोका आहे.
कन्या (Virgo)
कन्या राशीचे लोक नेहमी शिस्तप्रिय आणि नीटनेटके असतात. पण या काळात निर्णय घ्यायला गोंधळ होईल. डोकं शांत राहणार नाही, विचारांची गर्दी आणि संभ्रम वाढेल.घरात जुने विषय पुन्हा उफाळून येतील, नात्यांमध्ये कडवटपणा येईल. शरीरात पचनाशी संबंधित त्रास सुरू होईल. जबरदस्त संयम राखा आणि मोठ्या निर्णयांपासून थोडं लांब राहा.
कुंभ (Aquarius)
ग्रहण योगच या राशीत तयार झाल्यामुळे यांच्यावर संकटांचा भार सर्वाधिक आहे. झोप न लागणं, अस्वस्थ मन, गप्पगप्पपणा वाढेल. व्यवसायात चुकून चुकीचा निर्णय घेतला जाऊ शकतो. प्रेमात वाद आणि दुरावा होण्याची शक्यता जास्त. भावंडांशी किंवा घरच्यांशी संवादात खडखडाट निर्माण होईल.
मीन (Pisces)
मीन राशीच्या लोकांनी आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे. एका चुकीच्या वाक्यामुळे नातं कायमचं तुटू शकतं. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मानसिक तणावाचा असू शकतो, अभ्यासात लक्ष लागणार नाही. घरातल्या वातावरणावर तुमचं वागणं थेट परिणाम करू शकतं.मनात सकारात्मक विचार ठेवणं हेच उपाय ठरेल.
(Disclaimer | वरील दिलेली माहिती प्रसारमाध्यम व वाचकांसाठी बनवले आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही)
हे पण वाचा | Rashi Bhavishya: या तीन राशींचे भाग्य उजळणार! तयार झाला मोठा राज योग, कोणत्या आहे या राशी