Rain update : राज्याच्या हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. एकीकडे उष्णता तर दुसरी कडे मुसळधार पावसाचा इशारा यामुळे राज्यावर दुहेरी संकट निर्माण झालेले आहे. या पार्श्वभूमी वरती भारतीय हवामान खात्याने एक मोठा हवामान अंदाज वर्तवलेला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना आज येलो अलर्ट जारी करण्यात आलेल्या आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना पुढील 24 तासांमध्ये राज्यातील कशी परिस्थिती असेल हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी हा लेख सविस्तर वाचा. Rain update
भारतीय हवामान खात्याने, राज्यात लातूर, धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे. तर विदर्भातील भंडारा, गडचिरोली, गोंदिया तीन जिल्ह्यांना पुढील 24 तासात पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे.
राज्य मध्ये सध्या तापमानात मोठा चळवतार होताना पाहायला मिळत आहे मुंबईमध्ये कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान 23 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. तर पुण्यामध्ये दुपारपर्यंत निरभ्र आकाश राहणार आहे तर त्यानंतर ढगाळ हवामान राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एवढेच नाही तर कमल तापमान 37°c किमान तापमान 18 सेल्सिअस एवढी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर या काळामध्ये कोल्हापूर येथे सकाळी दुखी राहण्याची शक्यता असून आकाशअशांत ढगाळ राहील काळामध्ये कमल तापमान 37 सेल्सिअस तर किमान 23 सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. Rain update
भारतीय हवामान खात्याने राज्यातील लातूर धाराशिव नांदेड भंडारा गडचिरोली गोंदिया या सहा जिल्ह्यांमध्ये येत्या काळात पावसाचा इशारा दिलेला आहे यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी योग्य ते नियोजन करणे गरजेचे आहे कारण अचानक आलेला पावसाने शेती पिकाच्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे भारतीय हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेऊन शेती पिकाचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे नाहीतर नुकसानीला सामोरे जावे लागू शकते.
अशाच हवामाना विषयी अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट देऊन प्रा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर भारतीय हवामान खात्याचा हवामान अंदाज मिळण्यास मदत होईल. आणि हा लेख तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही हवामानविषयक अपडेट मिळेल.
हे पण वाचा | महाराष्ट्राच्या हवामानाबाबत मोठा अंदाज; राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; हवामान खात्याचा अंदाज जाणून घ्या
1 thought on “भारतीय हवामान खात्याचा मोठा अंदाज! या 6 जिल्ह्यांना येलो अलर्ट, पुढील 24 तास धोक्याचे!”