Rain Alert: महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. हवामान विभागाने पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसापासून सातत्याने येणाऱ्या आभाळामुळे राज्यात पुन्हा एकदा पाऊस मोठा जोर पकडणार असल्याची माहिती हवामान विभागांना दिली आहे. सात जुलै रोजी राज्यातील बहुतांश भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये विशेष 11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. यामुळे या भागातील नागरिकांनी अधिक सतर्क आणि सावधान राहणे गरजेचे आहे.
दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकण पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा हाहाकार होणार आहे. कोकण विभागात मुंबई आणि आणखीन काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. यामध्ये ठाणे पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहे या भागामध्ये अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. Rain Alert
पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथा परिसरात दिलेले आहे. या भागामध्ये अति मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. कोल्हापूर घाटमात्यासाठी येलो अलर्ट दिले असून पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणे अपेक्षित आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर मध्ये वादळी वाऱ्यासोबत विजेचा जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. या भागामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा | राज्यामध्ये पुढचे चार दिवस मुसळधार पाऊस नवीन अलर्ट पहा!
उत्तर महाराष्ट्रात धुळे नंदुरबार आणि नाशिक घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागातील नागरिकांना येलो अलर्ट देण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडणे अपेक्षित आहे. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील पावसाने चांगला जोर पकडला आहे. अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केले आहे. या भागामध्ये अति मुसळधार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये बुलढाणा आणि वाशिम या दोन जिल्ह्यांना मात्र पाऊस पडण्याची शक्यता नाही.
नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
- ज्या भागामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहे त्या जिल्ह्यातील नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. या भागातील नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा.
- नदी नाल्याच्या जवळपास विनाकारण जाणे टाळावे.
- वीज चमकत असताना घराबाहेर पडू नये आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधावे झाडाखाली बांधू नये.
- आपल्या परिसरातील स्थानिक प्रशासनाच्या सूचनेकडे लक्ष द्यावे.
एकंदरीत पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात पावसाचे जोरदार आगमन होणार आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे. पावसापासून आपली व आपल्या परिवारांची काळजी घ्यावी. असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
1 thought on “Rain Alert: राज्यात पुन्हा तुफान पाऊस होणार! 11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; नागरिकांनी सावधान रहावे..”