राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज..! या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी…


Rain Alert In Maharashtra: संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून ने दमदार पुनरागमन केले आहे. राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. 26 ते 30 जून या कालावधीत राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देखील देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टी आणि विदर्भातील काही भागात पावसाचा जोर जास्त राहणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे मात्र पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसत आहे. राज्यातील सर्व शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहत आहेत. अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण राज्यात पुढील पाच दिवस जोरदार पाऊस होणार असल्याचे सांगितले जात आहे.

हे पण वाचा| लाडक्या बहिणींना गुंतवणुकीसाठी खास 3 योजना; मिळेल जबरदस्त फायदा, जाणून घ्या

पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 27 ते 30 जून या कालावधीमध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा धोका आहे. या भागामध्ये मुसळधार पाऊस होऊन अतिवृष्टी सारख्या नैसर्गिक आपत्तीचे आगमन होऊ शकते. त्यामुळे येथील नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. पुणे शहरात पुढील चार दिवस हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असून पुणे घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यामध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

नाशिक आणि अहमदनगर सह उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. नाशिक मध्ये सध्या रिमझिम पाऊस सुरू असून घाटमाथ्यावर गुरुवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहे. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केल्याने गोदावरी घाटावरील पाण्याची पातळी नियंत्रणात आली आहे. पुढील तीन-चार दिवसात हवामानात मोठा बदल होऊन जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. Rain Alert In Maharashtra

हे पण वाचा| लाडक्या बहिणींना जून आणि जुलै महिन्याचे 3,000 रुपये एकत्रित मिळणार? मोठी अपडेट आली समोर…

विदर्भ आणि मराठवाड्यात किती पडणार पाऊस?

विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणारा असून, नागपूर शहरात बुधवारी रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. ज्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत व रोडवर देखील पाणी साचले आहे. काही भागांमध्ये एक फुटापर्यंत पाणी साचल्याने अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. अनपेक्षित पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. बुधवारी नागपूर मध्ये 8.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 26 ते 29 जून या कालावधीत अकोला अमरावती वर्धा, वाशिम यवतमाळ सह अनेक विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह वादळी वारे आणि जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हे पण वाचा| शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता सुधारित पिक विमा योजना सुरू; जाणून घ्या काय होणार फायदा?

मराठवाड्यातील काही भागांमध्ये हलका तर काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात मागील दोन आठवड्यापासून चांगला पाऊस न झाल्यामुळे खरीप हंगामातील जवळपास 35 हजार हेक्टर क्षेत्रावरील पेरणी खोळंबल्या आहेत. ज्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत असल्याचे दिसत आहे. विदर्भात अजूनही काही भागांमध्ये पावसाने मानावा तसा जोर पकडला नाही त्यामुळे पाणी प्रश्न आणखीन गंभीर होत चालला आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून पावसाने दांडी मारलेली आहे मात्र या भागात पुढील चार-पाच दिवसात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.

दरम्यान पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्यामुळे येथील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी पाळावी. हवामान विभागाच्या सूचनेचे पालन करणे आणि अनावश्यक प्रवास टाळणे हे सुरक्षितेसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. शेतकरी बांधवांनी पेरणीपूर्वी हवामान अंदाज लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा. कारण पेरणी केल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली तर तुमचे बी व पेरणीसाठी येणारा खर्च व्यर्थ जाऊ शकतो.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

error: Content is protected !!