Rain Alert : शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. राज्याच्या हवामानामध्ये मोठा बदल झाल्याने शेतकऱ्यांना पेरणी कधी करावा असा प्रश्न उपस्थित झाला होता. राज्यात अवकाळी पावसाने मोठा धमाका घातल्याने शेतकऱ्यांना देखील भुरळ घातली होती. त्यातच मान्सूनपूर्व पावसाने पण दाणा दान उडवली आहे. शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी शेतीची मशागत करण्यासाठी वेळ देखील मिळत नाही शेतकऱ्यांनी शेतीची मशागत कशी करावी असा प्रश्न देखील उपस्थित झालेला. तर अशातच मान्सून पुढे सरकले असल्याची बातमी समोर आलेली आहे आणि पावसाने दमदार बॅटिंग केली आहे. आज सकाळपासून राज्यातील काही भागात पावसाला सुरुवात झालेली आहे. Rain Alert
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मे महिन्याच्या अखेरीस मान्सून धडकणार आहे. सध्या मान्सून केरळ, गोवा, कर्नाटक, कोकण गुजरात पर्यंत राज्यात दाखल होईल अनेक भागात मुसळधार पाऊस तेव्हा ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज देखील वर्तवलेला आहे. तर अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन चक्रीवादळ तयार होणार आहे अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलेले आहे.
राज्यात चक्रीवादळाची शक्यता
आज सकाळी साडेआठ वाजता निरीक्षणा नुसार, दक्षिण कोकण गोवा किनारपट्टीच्या जवळ पूर्व मध्ये अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे त्यात 24 तासात अधिक तीव्रता याची जाणवणार आहे. त्यामुळे त्याचे रूपांतर शक्ती या चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे त्यामुळे पुढील काही दिवस सावध राहणे खूप गरजेचे आहे.
किनारपट्टीला अलर्ट
राज्यामध्ये सध्या वेगळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना देखील काळजी घेणे आवश्यक आहे राज्यात चक्रीवादळाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आणि कोकण केदारपट्टी लगत ऑरेंज अलर्ट जाहीर केलेला आहे तर रायगड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी केलेला आहे. तसेच यावेळी वाऱ्यांचा वेग 35 ते 40 किलोमीटर प्रतितास इतका असू शकतो. तर काही ठिकाणी तो ताशी 60 किलोमीटर इतका सुद्धा वेग असू शकतो. याच दरम्यान पुढील दोन ते चार दिवस मच्छीमारांना गुजराती महाराष्ट्र किनारपट्टीवर मासेमारी करता जाऊन या अशा आव्हान करण्यात आलेले आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस असेल, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या शुभांगी भुते यांनी दिली.
अनेक ठिकाणी शेतीची कामे खोळंबली
राज्यातील हा पाऊस शेतकऱ्यांसाठी एक मोठा धोका दायक काळ बनला आहे. त्यांना त्यांच्या रानातील शेतीचे कामे पेरणीसाठी पूर्ण करायचे आहे शेतीची योग्य प्रकारे मशागत झाली तरच पीक योग्य निघतो. राज्यात अनेक दिवसांपासून सुरू असल्याने शेतकऱ्यांची चांगली धावपळी उडाली आहे शेतीचे मशागतीचे काम कोळंबून गेले आहेत. शेतकरी मशागतीसाठी प्रतीक्षा करत आहे.
हे पण वाचा | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या तारखेला दाखल होणार महाराष्ट्रात मान्सून, वाचा सविस्तर माहिती
3 thoughts on “Rain Alert : राज्यात होणार मुसळधार! या जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याचा मोठा इशारा!”