Rain Alert: आत्ताची मोठी अपडेट समोर आलेली आहे, भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार देशाच्या हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बंगालच्या खाडीमध्ये विकसित होणाऱ्या चक्रीवादळाने अनेक राज्याच्या हवामानात सध्या बदल झाल्याच्या दिसून येत आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार चक्रीवादळाच्या प्रभावाने पूर्व उत्तर भारत देशाच्या 13 राज्यांमध्ये मोठी प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच अनेक राज्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह बर्पवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. Rain Alert
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, म्हटले आहे की, बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम नागालँड आणि आसपासच्या भागांमध्ये सुमारे १.५ किलोमीटर पर्यंत दिसून येत आहे. 19 फेब्रुवारी रोजी आसाम आणि मेघालय मध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्याचवेळी 21 फेब्रुवारी पर्यंत ईशान्यकडील राज्यांमध्ये मुसळधार पडू शकतो. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हवामानहे पण वाचा | महाराष्ट्राच्या हवामानाबाबत मोठी अपडेट! IMD चा मोठा इशारा
भारतीय हवामान खात्याचा अंदाज काय ?
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, उप हिमालय पश्चिम बंगाल आणि सिक्कीम इथे पुढील सात दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.
तसेच हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी दरम्यान हलका पाऊस आणि बर्फ वृष्टी होण्याची शक्यता आहे. 20 फेब्रुवारी रोजी या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बिहार मध्ये 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे यामुळे या भागातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे.
झारखंडमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यावेळी या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच पश्चिम बंगालमधील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेश मध्ये हवामानात थोडीशी घट होणार आहे. या ठिकाणी बुधवार आणि गुरुवारी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
हवामान तज्ञांच्या मते, चक्रीवादळाच्या एकत्रित परिणामामुळे, पुढील काही दिवसांमध्ये देशाच्या अनेक भागात पावसाने बर्फवृष्टी सुरूच राहील. यामुळे तापमानात चढ-उतार होऊ शकतात आणि हवामान थंड राहू शकते. IMD ने लोकांना सतर्क राहण्याचा आणि हवामानाच्या अपडेट्सवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिलेला आहे. त्यामुळे भारतीय हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेऊन नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
भारतीय हवामान खात्याचा अपडेट 👇