महिन्याला फक्त ₹1500 रुपये गुंतवा आणि मिळवा 35,लाख रुपये? पोस्ट ऑफिसची ही भन्नाट योजना तुम्हाला माहित आहे का?


Post office Yojana | आजच्या काळात बँक खात्यात थोडं थोडं जमा करत राहिले तरी म्हातारपणी हातात काहीच राहत नाही कारण महागाई वाढत चाललेली आहे आणि दिवसेंदिवस अत्यावश्यक वस्तू देखील वाढत चाललेले. आणि कितीही पैसे कमवले तरी खर्च होतोच. अशा वेळेस जर आपण एखाद्या योजनेमध्ये गुंतवणूक केली आणि तिथे पैसे गुंतवले तर म्हातारपणी त्या पैशांचा उपयोग होतो. पोस्ट ऑफिसच्या या योजनेवर विश्वास ठेवला तर तुम्हाला दिवसाला फक्त पन्नास रुपये बचत करून तुमच भविष्य उज्वल करता येणार आहे. पोस्ट ऑफिस ची ग्राम योजना ग्रामीण भागातील सामान्य माणसांसाठी तयार केलेली ही योजना, भविष्यातील आर्थिक आधार ठरू शकते. Post office Yojana

कोणतीही जोखीम नाही, सरकारची हमी, बोनस आणि मृत्यू झाल्यास वारसाला ला पूर्ण रक्कम मिळणारी ही योजना, खरंच एक स्वप्न फंड तयार करून देऊ शकते. दरमहा फक्त ₹1500 रुपये जमा करून तुम्ही 60 वयापर्यंत सुमारे  34.60  लाख रुपये मिळू शकतात. तर एखाद्याने 19 व्या वर्षीची योजना सुरू केली, तर त्याला दरमहा 1,515 रुपये भरावे लागतील आणि वयोमर्यादा 55,58 किंवा 60 वर म्युच्युरिटी घेतली, तरी मोठा फंड तयार होतो.

या योजनेची खास गोष्ट म्हणजे, पाच वर्षानंतर बोनस मिळतो, चार वर्षानंतर तुम्ही याच पॉलिसीवर कर्ज घेऊ शकता आणि तीन वर्षानंतर पॉलिसी सरेंडर करायची मोकळी ही आहे. यामध्ये दहा हजार ते दहा लाख पर्यंतची गुंतवणूक करता येते आणि प्रेमियम तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे मासिक, त्रैमाशिक, सहामाही किंवा वार्षिक भरू शकता.

वास्तिक पाहता, ही योजना अशा व्यक्तींसाठी वरदान ठरत आहे ज्यांना जोखीम नकोय, पण वयाच्या उत्तरा पर्यंत एक सुरक्षित फंड हवा आहे. शेतमजूर, शेतीवर असणारे मजूर किंवा छोट्या व्यवसायावर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागातील कुटुंबांना अशा हमी योजनेचा मोठा फायदा होऊ शकतो.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर गुंतवणूक करणाऱ्याचा मृत्यू 80 वर्षांपूर्वी झाला, संपूर्ण रक्कम वारसाला मिळते. त्यामुळे ही योजना केवळ पैशाची नव्हे, तर तुमच्या कुटुंबाच्या भविष्याची आहे. म्हातारपणी कोणी हात धरणार याची स्वाक्षता नसते, पण अशा योजनेत गुंतवणूक करून आपण स्वतःचा हात मजबूत करू शकतो.

(Disclaimer: वरील माहिती केवळ माहिती करत आहे कुठली आर्थिक गुंतवणूक करण्याबाबत सल्ला नाही. आर्थिक गुंतवणूक करणे बाबत तज्ञांचा सल्ला घ्या.)

हे पण वाचा | पोस्ट ऑफिसच्या MIS योजनेमध्ये ₹2 लाख गुंतवल्यास दरमहा किती रुपये व्याज मिळेल; जाणून घ्या सविस्तर

Leave a Comment

error: Content is protected !!