Post Office Scheme: तुमच्या घरात मुलगी जन्माला आली असेल तर समजा तुमच्या घरात लक्ष्मीच आली आहे असं समजा. कारण मुलींचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी सर्वात चांगला गुंतवणुकीचा पर्याय आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणून सुकन्या समृद्धी योजना ठरू शकते. ही योजना फक्त तुमच्या गुंतवणुकीला सुरक्षित ठेवत नाही तर आकर्षक व्याजदर आणि कर सवलती मध्ये मोठा फायदाही देते. चला तर या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
सुकन्या समृद्धी योजना का आहे?
सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली खास बचत योजना आहे. या योजनेला सरकारी हमी असल्यामुळे यामधील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे. या योजनेमध्ये मुलींच्या उज्वल भविष्यासाठी तुम्ही गुंतवणूक करू शकता. या योजनेत तुम्ही तुमच्या दहा वर्षाखालील मुलींच्या नावाने खाते उघडून गुंतवणूक करू शकता. तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही अधिकृत बँकेत हे खाते सुरू करू शकता. एका कुटुंबातील दोन मुलींना या योजनेचा लाभ घेता येतो आणि जर जुळ्या मुली असतील तर तीन खाते देखील उघडता येतात.
सुकन्या समृद्धी योजनेमध्ये तुम्ही दरवर्षी कमीत कमी 250 आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवणूक करू शकता. हे गुंतवणूक पंधरा वर्षासाठी करावी लागते. या योजनेमध्ये विशेष म्हणजे पंधरा वर्षापर्यंत गुंतवणूक केल्यानंतरही पुढील सहा वर्षासाठी गुंतवणुकीवर व्याज मिळत राहते. सध्या या योजनेमध्ये 8.2% इतका व्याजदर दिला जात आहे. जो इतर अनेक बचत योजनेपेक्षा खूपच जास्त आहे. या योजनेत गुंतवलेली रक्कम मिळालेल्या व्याज आणि मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम या दोन्ही गोष्टी टॅक्स फ्री आहेत. त्यामुळे तुम्हाला या योजनेअंतर्गत कर सवलतीचा चांगला फायदा मिळतो.
हे पण वाचा| पोस्ट ऑफिसच्या या खास योजनेमध्ये फक्त 5 वर्षात कमवता येणार ₹7 लाख, कसं काय ते जाणून घ्या सविस्तर?
खात्यातून पैसे कधी काढू शकता?
या योजनेच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी काही नियम लागू करण्यात आले आहेत. तुमची मुलगी 18 वर्षाची झाल्यावर किंवा तिचं दहावीचं शिक्षण पूर्ण झाल्यावर तुम्ही खात्यातील जमा झालेले एकूण रकमेच्या 50% रक्कम काढू शकता. पूर्ण रक्कम मात्र खाते 21 वर्षांचे झाल्यावर किंवा मुलीच्या लग्नाच्या वेळी तिचे वय 18 वर्षे पूर्ण असल्यानंतर काढता येते. Post Office Scheme
फक्त 400 रुपयाची गुंतवणूक करून लखपती कसे व्हावे?
समजा तुम्ही तुमच्या मुलीच्या नावाने खाते उघडले आणि दररोज फक्त 400 रुपये गुंतवणूक सुरू केली. म्हणजे तुम्ही महिन्याला सुमारे 12,500 रुपये आणि वर्षाला 1.5 लाख रुपये गुंतवत आहात. जर तुम्ही 15 वर्षासाठी ही गुंतवणूक सुरू ठेवली तर 21 वर्षांनी तुमच्या मुलीच्या खात्यात जवळपास 69.27 लाख रुपये जमा होतील. यामध्ये 22.5 लाख रुपये तुमची मूळ गुंतवणूक असेल. उर्वरित 46.77 लाख रुपये हे फक्त मिळालेले व्याज असेल.
सुकन्या समृद्धी योजना तुमच्या मुलीच्या शिक्षणापासून तर तिच्या लग्नापर्यंतच्या सर्व खर्चासाठी एक मजबूत आर्थिक आधार देणारी योजना आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही योजना बाजाराच्या जोखमेवर पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे तुमच्या मेहनतीची कमाई कोणत्याही कारणामुळे कुठे जाऊ शकत नाही. त्याचबरोबर तुम्हाला चांगला पडतो मिळण्याची हमी या योजनेमध्ये मिळते. तुमच्या मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आजच या योजनेचा विचार करू शकता.
1 thought on “Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये फक्त 400 रुपये गुंतवणूक करा आणि 70 लाख रुपये मिळवा”