पोस्ट ऑफिसच्या या योजनेत मिळवा दुप्पट नफा! ₹1 लाखाचे ₹2 लाख मिळतील…

Post Office Scheme: जर तुम्हाला देखील गुंतवणुकीवर चांगला आणि सुरक्षित परतावा हवा असेल तर पोस्ट ऑफिस ची ही योजना तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. बँकेची एफडी व्याजदर कमी झाले असतानाही पोस्ट ऑफिसच्या काही योजना अजूनही मोठ्या प्रमाणात आकर्षक व चांगले व्याजदर देत आहे. त्यापैकीच एक योजना म्हणजे किसान विकास पत्र योजना आहे. चला तर जाणून घेऊया या योजनेत तुमचे पैसे दुप्पट होण्यासाठी किती कालावधी लागतो आणि या योजनेमध्ये गुंतवणुकीचे फायदे काय आहे.

भारतीय रिझर्व बँक ने रेपो दरात कपात केल्यानंतर देशातील बहुतांश बँकांनी त्यांच्या एफडी योजनेच्या व्याजदरात घट केली आहे. मात्र पोस्ट ऑफिस ने आपल्या योजनेच्या व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे एफडी या पर्यायाचा शोध घेत असणाऱ्या लोकांसाठी पोस्ट ऑफिस मधील योजना अजून देखील मोठ्या फायद्याच्या ठरत आहे. तुम्हाला देखील एफडी करायचे असेल तर पोस्ट ऑफिस मध्ये एफडी केल्यानंतर सुरक्षा व चांगला परतावा मिळवता येईल. Post Office Scheme

हे पण वाचा | पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेत मिळणार पाच लाख रुपयांचा नफा; जाणून घ्या सविस्तर माहिती

किसान विकास पत्र (KVP) योजना म्हणजे काय?

किसान विकास पत्र (KVP) योजनाही भारत सरकारद्वारे चालवली जाणारी सुरक्षित बचत योजना आहे. या योजनेमध्ये एकदाच ठराविक रक्कम गुंतवणूक करावी लागते. या योजनेचा मुख्य उद्देश गुंतवलेला पैसा एका ठराविक कालावधीनंतर दुप्पट करणे असा आहे. या योजनेमध्ये तुम्ही तुमची रक्कम गुंतवून डबल करून घेऊ शकता.

KVP योजना 115 महिन्यात म्हणजेच नऊ वर्ष आणि सात महिने पूर्ण झाल्यानंतर मॅच्युअर होते. म्हणजे जर तुम्ही या योजनेत एक लाख रुपये गुंतवले तर ठराविक कालावधीनंतर तीच रक्कम तुम्हाला दोन लाख रुपये मिळेल. यामध्ये व्याज फिक्स असल्यामुळे मार्केटमधील चढउताराचा यावर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे हे एक सुरक्षित आणि स्थिर परताव देणारी योजना आहे. या योजनेला खात्रीशीर व्याज देणारी योजना देखील म्हटले जाते.

हे पण वाचा | सातबारा उताऱ्यांमधील चुकीच्या दुरुस्तीसाठी भूमी अभिलेख विभागाचा नवीन निर्णय! वाचा सविस्तर..

KVP योजनेमध्ये तुम्ही सिंगल खाते किंवा जॉईन खाते उघडू शकतात. जॉईन खात्यामध्ये कमाल तीन व्यक्तीचे नाव नोंदवले जाऊ शकते. ही योजना पोस्ट ऑफिस मार्फत चालवली जाते. ही योजना केंद्र सरकारची मान्यताप्राप्त असल्यामुळे या योजनेतील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे आणि यामध्ये परताव देखील चांगला मिळत असल्यामुळे अनेक लोकांचा कल या योजनेकडे दिसत आहे. तुम्ही देखील भविष्यासाठी सुरक्षित गुंतवणूक करू इच्छित असाल तर या योजनेत तुम्ही तुमची ठराविक रक्कम टाकून ठराविक कालानंतर दुप्पट रक्कम मिळवू शकतात.

ही योजना दीर्घकालीन गुंतवणुकीस इच्छुक असणाऱ्यांसाठी अतिशय योग्य आहे. त्याचबरोबर ज्यांना दरवर्षी व्याज नकोय पण एकत्रित मोठे रक्कम हवी आहे अशा लोकांसाठी देखील ही योजना खूप फायद्याची आहे. ज्या लोकांना सुरक्षित आणि सरकारद्वारे हमी दिलेली स्कीम हवी आहे अशा लोकांसाठी ही योजना फायद्याची व उपयोगाचे ठरू शकते.

हे पण वाचा | नुसता पैसाच पैसा! शेतकऱ्यांना एकदा या पिकाची शेती करून पहाच, किलोला मिळतोय 400 रुपये दर

पोस्ट ऑफिसची KVP योजनाही अशा नागरिकांसाठी सर्वोत्तम आहे. जे नागरिक दीर्घकालीन स्थिर पर्तवाचा शोध घेत आहेत. या योजनेत तुमचे पैसे काही काळानंतर दुप्पट होतात तेही ठराविक वेळेत आणि सरकारची हमी असल्यामुळे या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी कोणतेही शंका न ठेवता या योजनेतून गुंतवणूक करता येते.

Disclaimer: या लेखांमध्ये दिलेली माहिती सरकारी वेबसाईट आणि विश्वासनीय स्त्रोतांकडून घेतलेली आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. योजना काय आहे व्याजदर किती आहे आणि योजनेच्या अटी काय आहेत हे जाणून घ्या कारण अटी आणि व्याजदर वेळोवेळी बदलत असतो. यामुळे अधिकृत पोस्ट ऑफिस किंवा इंडियन पोस्ट च्या वेबसाईटवर भेट द्या किंवा जवळील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन या योजनेची सखोल चौकशी करा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “पोस्ट ऑफिसच्या या योजनेत मिळवा दुप्पट नफा! ₹1 लाखाचे ₹2 लाख मिळतील…”

Leave a Comment

error: Content is protected !!