FD, SIP विसरा! पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा 2.46 लाख रुपये


Post Office Scheme: आजकाल गुंतवणुकीसाठी अनेक जण चांगला पर्याय शोधत असतात. निवृत्त लोकांसाठी किंवा ज्यांना सुरक्षित आणि नियमित उत्पन्न हवे आहे त्यांच्यासाठी योग्य पर्याय निवडणे थोडे कठीण जाते. अनेक जण अजूनही बँकेच्या एफडी आणि इतर पारंपारिक योजनेंना प्राधान्य देतात. पण तुम्हाला माहित आहे का तुमच्या घराजवळील पोस्ट ऑफिस मध्ये अशी एक जबरदस्त योजना आहे जी तुम्हाला नेहमीच उत्पन्न तर देतेच याशिवाय तुमचे पैसे 100% सुरक्षित राहतील याची हमी देते. ती योजना म्हणजे ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही योजना केवळ उत्तम व्याज देत नाही तर निवृत्ती लोकांना त्यांच्या महिन्याच्या खर्चासाठी एक निश्चित उत्पन्नाची सोय करून देते.

किती टक्के व्याजदर मिळतो?

सध्याच्या काळात गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळून देणारी ही खूप महत्त्वाची योजना आहे. SCSS योजनेमध्ये सध्या 8.2% वार्षिक व्याजदर दिला जातो. जो बहुतेक बँकेच्या एफडी व्याजदरापेक्षा खूपच जास्त आहे. विशेष म्हणजे ही योजना भारत सरकार चालवते आणि त्यामुळे तुमच्या गुंतवणुकीला सरकारची सुरक्षा मिळते. म्हणजेच तुमच्या पैशाच्या सुरक्षेतेची पूर्ण जिम्मेदारी सरकारची आहे त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाही. Post Office Scheme

तीस 30 रुपये गुंतवल्यास दरवर्षी 2.46 लाखाचे उत्पन्न

या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे नियमित उत्पन्न आहे. जर तुम्ही या योजनेत एक वेळा तेच लाख रुपयाचे गुंतवणूक केली तर तुम्हाला दरवर्षी सुमारे 2.46 लाख रुपये व्याज मिळेल. हे व्याज तुम्हाला तिमाही आधारावर मिळेल म्हणजे दर तीन महिन्यांनी तुमच्या खात्यात सुमारे 61 हजार पाचशे रुपये जमा होतील. याचाच अर्थ तुम्हाला दरमहा सरासरी वीस हजार पाचशे रुपये मिळतील. निवृत्तीनंतरच्या जीवनात हे उत्पन्न तुमच्या अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी खूप आहे.

हे पण वाचा| पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेत दररोज ₹340 गुंतवा आणि मिळवा 7 लाख रुपयांचा नफा..

पात्रता काय आहे?

  • या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी साठ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे नागरिक असणे गरजेचे आहे.
  • पण 55 ते 60 वर्ष वयोगटातील ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी स्वइच्छेने निवृत्ती घेतले आहे ते देखील या योजनेत गुंतवणूक करू शकतात.
  • संरक्षण क्षेत्रातून निवृत्ती घेतलेल्या व्यक्तींसाठी वयाची मर्यादा 50 वर्ष आहे.
  • पती-पत्नी एकत्र मिळून संयुक्त खाते देखील उघडू शकतात.

या योजनेचा कालावधी पाच वर्षाचा आहे जो तुम्ही गरजेनुसार आणखीन तीन वर्षासाठी वाढवू शकता. पण जर तुम्ही ही गुंतवणूक वेळेआधी काढली तर काही नियम लागू होतात एका वर्षाच्या आत खात बंद केल्यास कोणताही व्याज मिळत नाही. दोन वर्षाच्या आत बंद केल्यास दंड लागतो. दोन ते पाच वर्षाच्या दरम्यान खात बंद केल्यास व्याजाच्या एक टक्का रक्कम कापली जाते. जर तुम्ही तुमच्या निवृत्तीची योजना आखत असाल किंवा तुम्हाला सुरक्षित आणि नियमित उत्पन्न मिळावा अशी अपेक्षा असेल तर पोस्ट ऑफिसची ही ज्येष्ठ नागरिक बचत योजना तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते.

असाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!