Post Office Scheme: धावपळीच्या जीवनात प्रत्येक जण सुरक्षित गुंतवणूक करण्याच्या शोधात असतो. प्रत्येकाला स्वतःच्या भविष्यासाठी थोडीफार गुंतवणूक करावी अशी इच्छा असते. मात्र आजकाल होणाऱ्या मोठ-मोठ्या घोटाळ्यांमुळे सुरक्षित गुंतवणूक कुठे करावी असा प्रश्न प्रत्येकाला पडतो. आज आपण या लेखांमध्ये अशाच एका पोस्ट ऑफिसच्या भन्नाट योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही फक्त व्याजातून दोन लाख 54 हजार पेक्षा जास्त नफा मिळवू शकतात.
संपूर्ण भारतातील नागरिकांना माहिती आहे की, पोस्ट ऑफिस ची गुंतवणूक सुरक्षित गुंतवणूक आहे. एखाद्या वेळी बँकेच्या एफडी योजनेतील पैसे बुडू शकतात मात्र पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेत गुंतवलेले पैसे बुडणे अशक्य आहे. कोणत्याही योजनेत पैसे गुंतवण्याआधी आपण ती योजना सुरक्षित आहे का नाही हे जाणून घेत असतो. मात्र पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवलेल्या पैशाची सरकार स्वतः हमी देत आहे. त्यामुळे पोस्ट ऑफिसच्या अनेक बचत योजनेत नागरिक स्वतःहून गुंतवणूक करत आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत पोस्ट ऑफिसच्या अशा एका विशेष बचत योजनेची माहिती, ज्याद्वारे गुंतवणूकदारांना चांगला फायदा होईल.
हे पण वाचा | रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी, हे काम करा अन्यथा रेशन कार्ड होईल बंद!
तुम्हाला देखील पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवणूक करून चांगला नफा मिळवायचा असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिस रिगरिंग डिपॉझिट योजनेत पैसे गुंतवून जबरदस्त नफा मिळू शकतात. या योजनेअंतर्गत तुम्हाला लोन सुविधा देखील उपलब्ध होते. जर तुम्ही या योजनेत तुमचे पैसे गुंतवले आणि तुम्हाला अचानक पैशाची आवश्यकता भासली तर तुम्ही या योजनेअंतर्गत लोन सुद्धा घेऊ शकतात. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही जवळपास अडीच लाखापेक्षा जास्त नफा मिळू शकतात. Post Office Scheme
पोस्ट ऑफिसच्या या योजनेअंतर्गत अडीच लाखापेक्षा जास्त नफा कसा मिळवायचा याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. पोस्ट ऑफिस अंतर्गत आरडी योजनेचे व्याजदर 6.7% एवढे आहे. पोस्ट ऑफिस आरडी योजनेचा असा फायदा आहे की यामध्ये तुम्ही थोडे-थोडे करून पैसे गुंतवू शकता आणि या पैशावर तुम्ही चांगला नफा देखील मिळू शकतात. या योजनेत गुंतवणूकदार त्यांच्या सोयीनुसार प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम गुंतवू शकतात. पोस्ट ऑफिस आरडी योजनेअंतर्गत लाखो लोक चांगला परताव मिळवत आहेत.
हे पण वाचा | ATM मधून पैसे काढण्यासाठी लागणार इतके पैसे? RBI लवकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!
अडीच लाखापेक्षा जास्त व्याज कसे मिळणार?
पोस्ट ऑफिस आरडी योजनेचा कालावधी हा पाच वर्षाचा असतो. जर तुम्ही पोस्ट ऑफिस आरडी योजनेअंतर्गत पाच वर्षासाठी प्रति महिना पाच हजार रुपयांच गुंतवणूक केली तर तुम्हाला पाच वर्षांनी सहा पॉईंट सात टक्के दराने तीन लाख 56 हजार 830 रुपये लाभ मिळणार आहे. यामध्ये तुम्ही गुंतवलेली रक्कम तीन लाख रुपये होते आणि उर्वरित 56 हजार 830 रुपये हे तुम्हाला व्याजातून मिळणार आहेत. मात्र तुम्हाला या योजनेतून अडीच लाखापेक्षा जास्त लाभ मिळवायचा असेल तर पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत हे खाते तुम्हाला एक्सटेंड करावे लागेल. म्हणजे तुम्हाला ही योजना अधिक कालावधीसाठी सुरू ठेवावी लागेल.
तुम्ही पोस्ट ऑफिस ची ही योजना अधिक कालावधीसाठी सुरू ठेवल्यानंतर तुम्हाला जास्त लाभ मिळेल. यासाठी तुम्हाला आणखीन पाच वर्ष गुंतवणूक वाढवावी लागेल. या पद्धतीने तुम्हाला दहा वर्षांनी पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेतून आठ लाख 54 हजार 270 रुपये मिळतील. यामध्ये तुम्ही गुंतवलेली रक्कम सहा लाख रुपये असणार आणि उर्वरित दोन लाख 54 हजार 270 रुपये हे तुम्हाला निव्वळ व्याजातून मिळणार आहेत. या पद्धतीने तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करून अडीच लाखापेक्षा जास्त नफा मिळू शकतात. विशेष म्हणजे पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही योजनेत पैसे गुंतवल्यानंतर तुम्हाला सुरक्षेतेची काळजी करायची गरज नाही.
1 thought on “पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेत फक्त एवढी रक्कम गुंतवा आणि मिळवा 2 लाख 54 हजार रुपये नफा”