Post Office RD Yojana: प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते की आपल्या अडचणीच्या काळात आपल्याकडे थोडीफार तरी बचत असावी. भविष्यात भक्कम आर्थिक आधार तयार करावा. यासाठी पोस्ट ऑफिस ची रँकिंग डिपॉझिट योजना म्हणजेच पोस्ट ऑफिस आरडी योजना हा एक उत्तम आणि सुरक्षित पर्याय ठरू शकतो. विशेषता मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न गटासाठी ही योजना अतिशय फायदेशीर आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही दरमहा एक निश्चित रक्कम गुंतवून पाच वर्षानंतर चांगला परतावा मिळू शकतात. भारत सरकारची हमी असल्यामुळे ही योजना सुरक्षेच्या बाबतीत अतिशय सुरक्षित आहे. आज या लेखामध्ये आपण पोस्ट ऑफिस आरडी योजना 2025 च्या सर्व महत्त्वाच्या बाबी जाणून घेणार आहोत. जसे की व्याजदर गुंतवणूक अर्ज प्रक्रिया अटी व नियमित कर लाभ लोन सुविधा ए टू झेड माहिती.
काय आहे पोस्ट ऑफिस आरडी योजना?
पोस्ट ऑफिस आरडी योजना ही एक शासकीय बचत योजना आहे. या योजनेत गुंतवणूकदार दर महिन्याला थोडी रक्कम जमा करत असतो. पाच वर्षानंतर त्याला मूळ रकमेसह आपला व्याज मिळते. ही योजना विशेषता नियमित उत्पन्न असणाऱ्यांसाठी अतिशय उपयोगी ठरत आहे. कारण या योजनेमध्ये जोखमीची शक्यता खूपच कमी आहे. या योजनेत तुम्ही दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करून मॅच्युरिटी नंतर चांगला परतावा मिळू शकतात.
हे पण वाचा | शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! यावर्षी महाराष्ट्रात मान्सून या तारखेपासून सुरू होणार…
महत्त्वाचे वैशिष्ट्ये
- सरकारी हमी: भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त आणि पूर्णपणे सुरक्षित असणारी ही योजना आहे.
- कमी रकमेपासून सुरुवात: या योजनेत तुम्ही अगदी 100 रुपयापासून गुंतवणुकीची सुरुवात करू शकता.
- जास्तीत जास्त गुंतवणुकीसाठी मर्यादा नाही: या योजनेत जास्त रक्कम गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी कितीही पैसे गुंतवू शकतात यासाठी कोणतेही मर्यादा नाही.
- फिक्स व्याजदर: या योजनेमध्ये सध्या 6.70% प्रतिवर्ष व्याजदर मिळतो, हा व्याजदर चक्रवाढ पद्धतीने दिला जातो.
- मॅच्युरिटी: या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर पाच वर्षासाठी मुदत असते. गुंतवणूकदारांना आपली रक्कम मिळवण्यासाठी कमीत कमी 60 महिने वाट पाहावी लागते.
- पैसे काढण्याची मुभा: जर काही कारणामुळे तुम्हाला ही योजना बंद करायची असेल तर तीन वर्षानंतर तुम्ही पैसे काढू शकतात.
- लोन सुविधा: या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर बारा महिने पूर्ण झाल्यावर जमा केलेल्या रकमेच्या 50% पर्यंत कर्ज घेता येते.
- ऑनलाइन/ऑफलाईन सुविधा: या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने खाते उघडू शकतात.
- दंड: दर महिन्याच्या फिक्स तारखे नंतर तुमचा हप्ता चुकल्यास तुम्हाला शंभर रुपया मागे एक रुपया दंड लागू शकतो.
हे पण वाचा | या लाडक्या बहिणींना मे महिन्यात 3,000 रुपये मिळणार; तुम्हालाही मिळणार का? जाणून घ्या सविस्तर
पोस्ट ऑफिस आरडी योजनेमधील व्याजदर
2025 साठी आरडी योजनेचा व्याजदर 6.7% एवढा आहे. हा व्याजदर तिमाही चक्रवृद्धी पद्धतीने लागू केला जात आहे. काही कालावधीसाठी सरासरी व्याजदर किती लागतो याबद्दल खाली माहिती दिली आहे. Post Office RD Yojana
- कालावधी 1 वर्ष – 6.90%
- 1 ते 3 वर्ष – 7 टक्के,
- 3 ते 5 वर्ष – 7.50 टक्के
पोस्ट ऑफिस आरडी योजनेसाठीची पात्रता
- भारतीय नागरिक: गुंतवणूक करणारा नागरिक हा भारतीय नागरिक असावा.
- दहा वर्षांपुढील: स्वतःचे खाते उघडण्यासाठी कमीत कमी दहा वर्षे वय असणे आवश्यक आहे.
- दहा वर्षाखालील: दहा वर्षाच्या खाली वय असेल तर तुम्हाला तुमच्या पालकाच्या नावाने खाते उघडावे लागेल.
- संयुक्त खते: जास्तीत जास्त तीन व्यक्ती मिळून आपले संयुक्त खाते उघडू शकतात.
- अनेक खती: एका व्यक्तीच्या नावावर एकापेक्षा जास्त खाती उघडू शकतात.
हे पण वाचा | लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! या दिवशी खात्यात जमा होणार मे महिन्याचा हप्ता; ₹1500 मिळणार का ₹2100?
खातं कसं उघडावे?
खातं उघडण्याच्या दोन पद्धती आहेत यामध्ये ऑनलाईन पद्धत आणि ऑफलाइन पद्धत दोन्ही पद्धती बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. Post Office RD Yojana
ऑफलाइन पद्धत
- सर्वप्रथम जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये भेट द्या.
- अर्ज भरून आधार पॅन व फोटोसह आपला अर्ज सादर करा.
- किमान शंभर रुपयाच्या पुढे रक्कम भरण्यास सुरुवात करा.
- ऑफलाइन पद्धतीने अर्ज उघडल्यानंतर तुम्हाला पासबुक मिळेल.
ऑनलाइन पद्धत:
- सर्वप्रथम इंडियन पोस्ट वेबसाईटवर भेट द्या. किंवा इंडियन पोस्ट मोबाईल ॲप वर लॉगिन करा.
- त्यानंतर RD सेक्शन मध्ये जाऊन अर्ज भरा.
- आवश्यक असणारे सर्व डॉक्युमेंट अपलोड करा आणि पेमेंट करा.
- यानंतर एसएमएस किंवा ईमेल द्वारे खात्याची पुष्टी होईल.
हे पण वाचा | पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता कधी मिळणार? लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव आहे का? जाणून घ्या मोबाईलवर
पोस्ट ऑफिस आरडी योजनेचे फायदे
- पोस्ट ऑफिस आरडी योजना गुंतवणुकीसाठी अगदी सुरक्षित आहे व या योजनेत सरकारी हमी मिळते.
- मार्केट बदलण्याचा परिणाम जास्त होत नाही कारण यामध्ये फिक्स परतावा मिळतो.
- या योजनेत थोडी बचत मोठा फंड तयार होतो मध्यमवर्गीयासाठी अतिशय उपयुक्त आहे.
- आपत्कालीन परिस्थितीमध्ये लोन सुविधा मिळते.
- ऑनलाइन सुविधा असल्यामुळे घरबसल्या तुम्ही खाते उघडू शकता.
हे पण वाचा | महाराष्ट्राच्या हवामानाबाबत मोठी बातमी! राज्यावरती पुन्हा दुहेरी संकट! या सहा जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
पोस्ट ऑफिस आरडी योजनेचे तोटे
- या योजनेत कर सवलत नसल्यामुळे व्याजावर कर लागू शकतो.
- तीन वर्षांपूर्वी आपले पैसे काढणे शक्य होत नाही.
- फिक्स व्याजदर असल्यामुळे मार्केट वाढल्यास व्याजदर वाढत नाही.
- हप्ता भरण्याचा चुकल्यास दंड भरावा लागतो.
पोस्ट ऑफिस आरडीयो योजना 2025 ही मध्यमवर्गीयासाठी अतिशय चांगली आणि शासकीय बचत योजना आहे. नियमित मासिक गुंतवणूक सुरक्षित परताव लोन सुविधा आणि ऑनलाईन सोयी सुविधा यामुळे ही योजना भविष्यात आर्थिक गरजांसाठी अतिशय उपयोगी ठरू शकते.
Disclaimer: वरील माहिती सामान्य नागरिकांपर्यंत या योजनेची माहिती देण्याच्या उद्देशाने देण्यात आली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित अधिकृत संकेतस्थळावर किंवा जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन याबाबतची खात्री करून घ्यावी. व्याजदर व नियम काळानुसार बदलू शकतात त्यामुळे सर्व माहिती योग्यपणे तपासणी आवश्यक आहे. कोणत्याही आर्थिक नुकसानीसाठी आम्ही व आमची टीम जबाबदार राहणार नाही.