Post Office Plan 2025 : देशात सध्या बँक एफडी वरील व्याजदर घसरले असताना सुरक्षित गुंतवणुकीचा विचार करणाऱ्यांसाठी पोस्ट ऑफिसच्या काही योजना आकर्षक पर्याय ठरू शकतात. रिझर्व बँकेने रिपो दरात कपात केल्यानंतर बऱ्याच बँकांनी एफडीवरील व्याजदर कमी केलेले आहे. अशावेळी जर तुम्ही कमी जोखमी शिवाय गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळवायचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या काही महत्त्वाच्या पाच योजना ज्या तुम्हाला फायदेशीर परतावा मिळून देऊ शकतात. चला तर जाणून घेऊया कोणत्याही या योजना. Post Office Plan 2025
सुकन्या समृद्धी योजना
मुलीच्या भविष्याची आर्थिक घडी मजबूत करण्यासाठी सरकारने सुरू केलेली सुकन्या समृद्धी योजना (SSY) सध्या 8.20 टक्के व्याजदर देते. या योजनेत दरवर्षी किमान 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवणूक करता येते. खातं उघडल्यापासून पंधरा वर्षांपर्यंत रक्कम जमा करता येते आणि कलम 80c अंतर्गत कर सवलतीचा लाभ देखील मिळतो. मुलीच्या दहा वर्षाखालील वयातच खाते उघडावे लागेल.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS)
60वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक बचत योजना हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. 1 हजार रुपयांपासून तीस लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. सध्या या योजनेवर 8.20 टक्के व्याजदर मिळतो. योजना पाच वर्षासाठी असली तरी नंतर तीन वर्षासाठी वाढवण्याची मुभा दिली जाते. या योजनेत ही कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळतो.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ( PPF)
दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय शोधत असाल तर पब्लिक प्रॉव्हिडंट फंडा सर्वोत्तम पर्याय आहे. किमान पाचशे रुपयांपासून आणि जास्तीत जास्त 1.5 लाखांपर्यंत वार्षिक गुंतवणूक करता येणार आहे. सध्या PPF 7.10 टक्के व्याज दिला जात आहे. पंधरा वर्षाच्या कालावधीनंतर खाते वाढवण्याची मुभा असते. या योजनेवर मिळणारा परतावा पूर्णपणे करमुक्त असतो.
किसान विकास पत्र (KVP)
जास्तीत जास्त काळजी मुक्त गुंतवणुकीसाठी किसान विकास पत्र हा चांगला पर्याय मानला जातो. यामध्ये एक हजार रुपयांपासून गुंतवणूक करता येते आणि कोणतीही वरची मर्यादा नाही. सध्या यावरती 7.50 टक्के व्याज दिले जात आहे. या योजनेतील रक्कम अडीच वर्षानंतर काढता येते. मात्र, यात कर सवलत मिळत नाही. ज्यांना दीर्घकालीन आणि हमखास परतावा हवा आहे, त्यांच्यासाठी ही योजना उत्तम आहे. .
नॅशनल सिविंग सर्टिफिकेट ( NSC)
NSC ही आणखी एक सुरक्षित गुंतवणूक योजना आहे. जी पाच वर्षाच्या कालावधीसाठी असते, किमान 1000 रुपयांचे गुंतवणूक आवश्यक असून वरची मर्यादा नाही. सध्या NSC वर7.70 टक्के व्याजदर लागू आहे. तर कलम 80C अंतर्गत कर सवलत मिळते. NSC मधील व्याज वार्षिक रित्या खात्यात जोडले जाते आणि आणि परपक्वितेच्या वेळी एकत्रित मिळते.
बँक एफडीवर व्याजदर घसरले असताना सुरक्षित आणि चांगल्या परताव्याच्या शोधात असलेल्या पोस्ट ऑफिस या योजनेचा फायदा नक्कीच तुम्हाला होणार आहे. सरकारच्या पाठबळामुळे या योजना अत्यंत सुरक्षित आहेत. मात्र, गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतःच्या आर्थिक गरजा आणि उद्दिष्टांचा विचार करून निर्णय घेणे अधिक योग्य ठरेल.
Disclaimer : वरील दिलेली माहिती ही आम्ही वाचकांसाठी बनवली आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित आर्थिक तज्ञांचा सल्ला घ्या.
हे पण वाचा | Post Office Scheme : पोस्ट ऑफिस ची भन्नाट योजना; गुंतवणूक केल्यास मिळणार 20000 रुपये महिना