Post Office Monthly Income Scheme: आजकाल प्रत्येक जण गुंतवणुकीसाठी अनेक वेगवेगळे पर्याय शोधत असते. पण आजही अनेक लोकांना सुरक्षित आणि हमखास परताव देणाऱ्या योजनेमध्ये पैसे गुंतवायला आवडतात. प्रत्येकाला ठराविक रक्कम गुंतवून दर महिन्याला घर खर्च भागवण्यासाठी चांगला परतावा देणारी योजना शोधत असतात. अशावेळी पोस्ट ऑफिसच्या विविध बचत योजना एक उत्तम पर्याय ठरतात. पोस्ट ऑफिस आपल्या देशातील नागरिकांच्या सोयीनुसार आणि गरजेनुसार अनेक योजना राबवत आहे. यामध्ये आरडी (RD) टीडी (TD) पीपीएफ (PPF) आणि किसान विकास पत्र यासारख्या अनेक योजनेचा समावेश आहे.
यापैकीच एक अत्यंत लोकप्रिय योजना म्हणजे मासिक उत्पन्न योजना (monthly income scheme – MIS). नावाप्रमाणेच ही योजना अशी आहे जिथे तुम्हाला एकदाच पैसे गुंतवावे लागतात आणि त्यानंतर दर महिन्याला निश्चित व्याज मिळते. निवृत्त लोकांसाठी किंवा ज्यांना दरमहा ठराविक उत्पन्न पाहिजे अशा नागरिकांसाठी ही योजना खूपच फायद्याची ठरू शकते. या योजनेत किती रुपये गुंतवल्यानंतर किती रुपये दरमहा मिळतील? याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
पोस्ट ऑफिसच्या मंथली इनकम स्कीम मध्ये तुम्ही फक्त एक हजार रुपयांपासून गुंतवणूक करू शकतात. ही योजना लहान बचत करणारा साठी देखील खूप महत्त्वाची ठरू शकते. या योजनेत तुम्ही एका खात्यात जास्तीत जास्त नऊ लाख रुपये गुंतवू शकतात. जर तुम्ही संयुक्त खाते उघडण्याचा विचार करत असाल तर तुम्ही जास्तीत जास्त पंधरा लाख रुपये या योजनेत गुंतवू शकता. विशेष म्हणजे संयुक्त खात्यामध्ये जास्तीत जास्त तीन जणांची नाव जोडता येतात. सध्या पोस्ट ऑफिस MIS योजनेवर 7.6% व्याजदर दिला जातो. ही योजना पाच वर्षात मॅच्युअर होते. म्हणजे 5 वर्षानंतर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर परतावा मिळण्यास सुरुवात होईल.
हे पण वाचा| पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेत दररोज ₹340 गुंतवा आणि मिळवा 7 लाख रुपयांचा नफा..
दोन लाखाच्या गुंतवणुकीवर किती व्याज मिळेल?
जर तुम्ही पोस्ट ऑफिस MIS योजनेत दोन लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला किती लाभ मिळेल याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे पोस्ट ऑफिस बचत खाते असणे आवश्यक आहे. जर नसेल तर जवळील पोस्ट ऑफिस कार्यालयात जाऊन पोस्ट ऑफिस खाते उघडून घेऊ शकता. तुम्ही दोन लाख रुपये जमा केल्यास तुम्हाला पुढील पाच वर्षासाठी दरमहा 1233 रुपये इतके निश्चित आणि हमखास व्याज मिळेल. Post Office Monthly Income Scheme
याचा अर्थ दर महिन्याला तुमच्या खात्यात हे पैसे जमा होतील. पाच वर्षाच्या कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जमा केलेले संपूर्ण दोन लाख रुपये तुमच्या खात्यात परत जमा करून घेऊ शकता. याशिवाय तुम्हाला पाच वर्षात दरमहा 1233 रुपये याप्रमाणे एकूण 73 हजार 980 रुपयापर्यंत व्याज मिळेल. ही एक अशी योजना आहे जिथे तुमचे मूळ धन सुरक्षित राहते आणि तुम्हाला दर महिन्याला निश्चित उत्पन्न मिळते. या उत्पादनातून तुम्ही तुमचा घर खर्च भागू शकता. गुंतवणूक करताना नेहमी लक्षात ठेवा की कोणत्याही योजनेत पैसे गुंतवण्यापूर्वी त्या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे असते. पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम योजनेमध्ये गुंतवणूक करणे पूर्णपणे सुरक्षित आहे.