Post Office Monthly Income Scheme: आजकाल प्रत्येक जण आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधत असते. यासाठी लोक विविध योजनेमध्ये गुंतवणूक करतात. अनेक वेळा सरकारी योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपली तयारी दर्शवतात. कारण त्यात गुंतवणुकीची हमी असते आणि मॅच्युरिटी नंतर चांगला परतावा देखील मिळतो. जर तुम्ही देखील अशाच एखाद्या चांगल्या योजनेच्या शोधात असाल त्यामध्ये गुंतवणूक केली तर निवृत्तीनंतर तुम्हाला चांगला परतावा मिळू शकेल. तर पोस्ट ऑफिसच्या या जबरदस्त योजनेत तुम्ही तुमची गुंतवणूक करून मासिक खर्चाच्या उपयोगासाठी ठराविक रक्कम मिळवू शकतात.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ही एक अशी जबरदस्त योजना आहे जी तुम्हाला चांगला परतावा देते आणि दरमहा एक निश्चित रक्कम मिळू शकते. जर तुम्ही या योजनेत ठराविक रक्कम गुंतवली तर तुम्हाला निवृत्तीनंतर इतर कोणत्याही आर्थिक गरजेच्या वेळी नियमित उत्पन्नाचा स्रोत मिळतो. या योजनेत सरकार स्वतः गुंतवणुकीची हमी देते त्यामुळे ही योजना पूर्णपणे सुरक्षित मानली जाते. या योजनेत कशाप्रकारे गुंतवणूक करून तुम्ही दरमहा ठराविक रक्कम मिळू शकतात याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना काय आहे?
पोस्ट ऑफिस ची मासिक उत्पन्न योजना ही एक सरकारी हमी देणारी योजना आहे जिथे तुम्हाला गुंतवलेले रकमेवर दर महिन्याला व्याजातून ठराविक रक्कम मिळते. यामुळे निवृत्तीनंतर किंवा इतर कोणत्याही आर्थिक गरजेच्या वेळी तुम्हाला दैनंदिन गरजा भागवण्यासाठी मोठा फायदा मिळतो. या योजनेत सरकार स्वतः गुंतवणुकीची हमी देते त्यामुळे ही योजना पूर्णपणे सुरक्षित मानली जाते. या योजनेची पात्रता गुंतवणुकीची मर्यादा याबद्दल जाणून घेऊया.
योजनेची पात्रता व मर्यादा
- या योजनेत 18 वर्षावरील कोणत्याही भारतीय नागरिकांना गुंतवणूक करता येते.
- तुम्ही फक्त एक हजार रुपये गुंतवून या योजनेत खाते उघडू शकता.
- या योजनेत तुम्ही जास्तीत जास्त नऊ लाख रुपयापर्यंत गुंतवणूक करू शकता.
- संयुक्त खात्यात तुम्ही जास्तीत जास्त 15 लाख रुपयापर्यंत गुंतवणूक करू शकता.
हे पण वाचा| मेष, मिथुन आणि ‘या’ दोन राशींसाठी आजचा दिवस कठीण जाणार! सावधान रहा नाहीतर…
व्याजदर आणि मॅच्युरिटी
या योजनेत सध्या 7.4% व्याजदर दिला जातो जो इतर कोणत्याही सरकारी हमी असणाऱ्या योजनेपेक्षा खूप जास्त आहे. हा व्याजदर दर महिन्याला दिला जातो या योजनेच्या मॅच्युरिटी कालावधी पाच वर्षाचा आहे याचा अर्थ तुम्ही गुंतवलेले पैसे पाच वर्षानंतर तुम्हाला काढायचे असल्यास तुम्ही काढू शकतात. मात्र खाते उघडल्यानंतर एक वर्षापर्यंत तुम्ही पैसे काढू शकत नाहीत. Post Office Scheme
दरमहा 5500 रुपये कसे मिळवावे?
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल पोस्ट ऑफिसच्या या योजनेत दर महिन्याला पाच हजार पाचशे रुपये रिटर्न्स कशा मिळवावा? जर तुम्ही देखील या योजनेअंतर्गत दर महिन्याला चांगला परतावा मिळू इच्छित असाल तर खालील स्टेप फॉलो करा.
- जर तुम्ही सिंगल खात्यात नऊ लाख रुपये गुंतवले तर सध्याच्या 7.4% व्याजदर अनुसार तुम्हाला दरमहा 5500 रुपये व्याज मिळेल.
- जर तुम्ही संयुक्त खात्यात जास्तीत जास्त 15 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला दरमहा 9250 रुपये व्याज मिळेल.
- तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हे व्याज तिमाही सहामाही किंवा वार्षिक आधारावर देखील घेऊ शकता.
खाते कसे उघडावे?
आता या योजनेत खाते कसे उघडावे? तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळील पोस्ट ऑफिस मध्ये जावे लागेल. तिथे तुम्हाला अर्ज करावा लागेल आणि खालील कागदपत्रे अपलोड करावे लागतील.
- अकाउंट ओपनिंग फॉर्म
- केवायसी कागदपत्रे
- पॅन कार्ड
पोस्ट ऑफिस मंथली इन्कम योजनेचे वैशिष्ट्ये
- या योजनेत सरकारकडून गुंतवणुकीची हमी मिळते त्यामुळे तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत. मॅच्युरिटी नंतर तुम्हाला नियमित मानसिक उत्पन्न मिळते जे तुमच्या निवृत्तीनंतर तुमच्या खर्चाचा आधार बनू शकते.
- हे व्याज थेट तुमच्या खात्यात जमा केले जाते.
जर तुम्ही निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी किंवा नियमित मासिक उत्पन्नासाठी चांगल्या आणि सुरक्षित गुंतवणुकीचा शोध घेत असाल तर पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते. आजच आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन आपले खाते उघडून या योजनेचा लाभ घ्या. कारण तुम्ही आज उचललेले पाऊल तुमच्या भविष्यासाठी फायद्याचे ठरू शकते.