पोस्ट ऑफिसची नाद खुळा योजना; 9 लाख रुपयाच्या गुंतवणुकीवर मिळणार 13 लाख रुपये, वाचा सविस्तर माहिती


Post Office Investment : सध्याच्या काळामध्ये पैशाची गुंतवणूक करणे सगळ्यांसाठीच महत्वाची आहे. गरीब असो किंवा श्रीमंत सर्वांनाच गुंतवणुकीची ओढ असते. परंतु गुंतवणूक कुठे करावी हा प्रश्न सध्या उपस्थित होतो. जर तुम्हाला देखील गुंतवणूक करायची असेल आणि तुमचे भविष्य सुरक्षित करायचे असेल आणि थोडेफार शिल्लक रक्कम असून ती मोठी बनवायची असेल तर ही एक महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी ठरणार आहे. अशा परिस्थितीमध्ये बँकेत टाकून पैसे ठेवणे ऐवजी एखाद्या योजनेमध्ये गुंतवणूक करून चांगली रक्कम तयार करू शकणार आहात. Post Office Investment

अशीच एक योजना पोस्ट ऑफिस अंतर्गत राबविण्यात येत आहे. ती म्हणजे पोस्ट ऑफिस राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना म्हणजे NSC योजना ग्रामीण भागातील लोकांसाठी एकदम महत्त्वाचा पर्याय.

ही योजना सरकारची हमी असलेली आहे. म्हणजे जर तुम्ही तुमच्या निवृत्तीचा पैसा, जमीन विकून मिळवलेला पैसा, शेताच्या हंगामावर मिळवलेला लाभ काहीही एक रकमी रक्कम असेल, तर NSC मध्ये गुंतवणूक केल्यास तुमचे पैसे सुरक्षित राहतील आणि हळूहळू रक्कम देखील वाढणार आहे.

या योजनेमध्ये एकट्याने किंवा पती पत्नीने एकत्रित खाते उघडून गुंतवणूक करता येते. कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन KYC करून, कागदपत्र जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे कागदपत्र देऊन सहज सुरू करता येते.

या योजनेमध्ये तुम्ही किमान फक्त 1000 रुपयांपासून ते कमाल गुंतवणुकीवर कोणती मर्यादा नाही. दरवर्षी मिळणाऱ्या व्यास तुम्हाला 7.7% (By compounding method) असणार आहे. योजना पूर्ण होण्याची मुदत पाच वर्ष. आणि कर सवलत कलम 80c अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करमुक्त.

या योजनेला सरकारची हमी आहे. म्हणजे बँक बुडाली, शेअर मार्केट कोसळल, अशा परिस्थितीमध्ये तुमचं NSC मधील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असते. शिवाय कोणत्याही वेळी गरज लागली, तर NSC गहाण ठेवून कर्ज घेण्याची सोय आहे. फक्त ही योजना 5 वर्षापूर्वी बंद करता येत नाही. पण चांगली गोष्ट म्हणजे पैसे न मोजता गरजेचं कर्ज सहज मिळवता येतात.

जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन तुम्ही गुंतवणूक करू शकता आणि तिथे आवश्यक असलेले कागदपत्रे जोडा.

(Disclaimer: वरील माहिती केवळ माहिती करीत आहे कुठलीही आर्थिक गुंतवणूक बाबत सल्ला नाही गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.)

हे पण वाचा | पैसे दुप्पट करणारी पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना! जाणून घ्या योजनेबद्दल सविस्तर माहिती

Leave a Comment

error: Content is protected !!