Pm Kisan Yojana Update : पीएम किसान योजनेचे ₹2 हजार रुपये आले नाही? हे काम करा तरच मिळतील पैसे

Pm Kisan Yojana Update : गेल्या काही महिन्यांपासून अनेक शेतकऱ्यांच्या तोंडून एक वाक्य ऐकू येत आहे, ती म्हणजे भाऊ यावेळी पी एम किसान योजनेचे पैसे अजून खात्यावर जमा झाले नाही, काहीजण तर दोन-तीन हप्त्यांपासून वाट पाहत आहे. मग प्रश्न येतो, नेमकं अडथळा कुठे आहे? केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देण्यासाठी 2019 पासून सुरू केलेली ही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना म्हणजे “Pm Kisan Yojana” ही शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत करणारी महत्त्वाची योजना आहे.

ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खातावर आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होते. योजनेच्या नियमाप्रमाणे दर चार महिन्यांना शेतकऱ्यांना दोन हजार रुपये दिले जातात. परंतु सध्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या हप्ते थांबलेले आहेत, आणि यामागे काही महत्त्वाचे कारणे आहेत. जर तुम्हालाही हप्ता आलेला नसेल, तर पुढील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि तातडीने हे काम करा अन्यथा तुम्हाला पुढचा हप्ता मिळणार नाही.Pm Kisan Yojana Update

सर्वात मोठा कारण म्हणजे आणि सामान्य e-KYC पूर्ण नसणे. केंद्र सरकारने पीएम किसान योजनेत E-KYC लागू केलेली आहे. जोपर्यंत शेतकऱ्याच्या आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक करून OTP आधारित अथवा बायोमेट्रिक eKYC पूर्ण होत नाही, तोपर्यंत हप्ता थांबतो. त्यामुळे जो कोणी शेतकरी e-KYC, न करता बसलेला आहे, त्याचा हप्ता थांबलेला असतो. त्यामुळे लवकरात लवकर आपल्या गावाच्या किंवा जवळच्या CSC केंद्र, किंवा कृषी सहायकाकडे जाऊन प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे जमिनीचा प्रामाणिकरण (Land Seeding). योजनेत लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याचे नाव 7/12 उताऱ्यावर असणे आवश्यक आहे. व त्याची माहिती पोर्टलवर संलग्न झाली पाहिजे. बऱ्याचदा शेतकऱ्यांची नोंदणी करूनही land Seeding होत नाही, त्यामुळे अर्ज अर्धवट राहतो आणि हप्ता अडकतो. महसूल विभागाकडून किंवा कृषी विभागाकडून तपासून घेऊन हे काम पूर्ण करणे आवश्यक आहे.

तिसरं कारण म्हणजे बँक खाते आणि आधार कार्ड लिंक नसणे तसेच बँक खाते डीबीटी एनेबल नसणे. पी एम किसान चा रकमा डीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरची जमा होतात. खात आधार कार्ड लिंक नसेल, किंवा डीबीटी खातं बंद असेल, तर पैसे अडकतात. काही वेळा अजूनही खाते बंद झालेले असता आणि नवीन खात्याची माहिती अपडेट न केल्यामुळे ही प्रॉब्लेम येतात. त्यामुळे संबंधित बँक खात्यामध्ये जाऊन खाते प्रक्रिया पूर्ण आहे का तपासा, आधार लिंक आहे का पहा, आणि डीबीटी अपडेट करून घ्या. सोबतच अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दुसऱ्याचं आधार कार्ड लिंक झालेला असत ची फार मोठं कारण बनते हप्ते थांबविण्याचा. त्यामुळे बँकेत जाऊन eKYC व आधार तपासणी करून घ्या.

चौथं कारण म्हणजे नोंदणीनंतर आधार कार्ड बदल झालेला असतो. नाव, पत्ता जन्मतारीख, किंवा लिंग यामध्ये बदल केला, पण ही माहिती पोर्टलवर अपडेट केली नाही, तर मिस मॅच होतो आणि हप्ता थांबतो. त्यासाठी तुमचं pmkisan.gov.in या पोर्टलवर लॉगिन करून आधार माहिती योग्य आहे का ते तपासावा लागत.

हप्ता न मिळाल्यास अनेकदा शेतकरी भ्रमात राहतात की, आपण अपात्र झालो आहोत का? किंवा “आता आपल्या ला पैसे मिळणार नाहीत का?” पण खरं सांगायचं तर 70% प्रकरण ही केवळ कागदा पत्रांची त्रुटी किंवा प्रक्रिया अर्धवट असल्यामुळे अडकतात. म्हणूनच जर तुमचा हप्ता थांबलेला असेल, तर अपात्र ठरवलं म्हणून घाबरण्याऐवजी तुमची सगळी माहिती व्यवस्थित पडताळून घ्या.

तुम्हाला हे समजून घ्यायचं असेल की तुम्हाला हप्ता का मिळाला नाही, तर खालील गोष्टी तपासा

  • Pmkisan.gov.in या वेबसाईटवर बेनिफिशरी टेटस चेक करा.
  • आता मिळालाय का, कोणत्या तारखेला जमा झाला, ते पहा.
  • त्यानंतर FTO IS Generated and payment is pending. असे मेसेज असेल तर लवकरच मिळेल.
  • परंतु त्या जागी जर Rejected असा मेसेज असेल तर कारण पहा, आधार Mismatch, खाते अयोग्य, KYC अपूर्ण अशी काही कारण असेल.

जर वर दिलेले काही कारण लागू असतील तर तुम्ही तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रात किंवा गावातल्या ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांच्याकडून ही प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकता.

  • तसेच बँकेत जाऊन खाते डीबीटी सक्षम आहे का हे तपासणी खूप आवश्यक आहे तर pmkisan.gov.in पोर्टलवर जाऊन Beneficiary Status, Aadhaar Correction, Bank Update या पर्यायांचा उपयोग करा.

ही योजना केंद्र सरकारकडून लाखो शेतकऱ्यांना आधार मिळून देणारी योजना आहे, पण प्रक्रिया नीट नसल्यामुळे काही शेतकऱ्यांना अद्याप या योजनेचा लाभ मिळत नाही त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या हप्ते थांबले आहेत त्यांनी तात्काळ वरील प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. काही वेळेस फक्त बँकेत मोबाईल नंबर अपडेट केला नाही म्हणून ओटीपी KYC होत नाही आणि हप्ता थांबतो. त्यामुळे माहिती छोटी असली तरी ती काळजीपूर्वक लक्षात घेणे आवश्यक आहे.

पीएम किसान सारख्या योजनांचा लाभ सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि हप्ता वेळेवर मिळावा यासाठी प्रत्येकाने आपली माहिती योग्य ठेवणे आणि वेळोवेळी अपडेट करणे आवश्यक आहे. एक वेळ मोबाईल बदलू नका, दर लिंक झालेल्या खात आणि आधार कार्ड क्रमांक अपडेट ठेवा. आता थांबला तर लगेच कुठेही फिरत बसू नका वरील मार्गदर्शनानुसार थोडं डोकं लावा आणि स्वतः तपासुन घ्या.

माहितीस्त्रोत : Government websites and notifications

लेखक : सौरभ गायकवाड ( महाराष्ट्र बातमी )

Leave a Comment

error: Content is protected !!