Pm Kisan Yojana Update : सध्या सायबर गुन्ह्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यामुळे नागरिकांसाठी टार्गेट केले जात आहे. आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सायबर गुन्हेगाराकडून फसवल्याची माहिती समोर आलेली आहे. पीएम किसान योजनेच्या नावाखाली फेक लिंका पाठवून शेतकऱ्यांच्या मोबाईल हॅक करणे नवीन फसवणुकीचे तंत्र समोर आलेले आहे. नाशिक मध्ये या प्रकारामुळे अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपये बँकेमधून गायब झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आलेली आहे. Pm Kisan Yojana Update
फसवणुकीची नवीन यंत्रणा
सायबर गुन्हेगाराकडून सोशल मीडियावर पीएम किसान योजने नावाची संबंधित बोगस लिंक्स किंवा ॲप फाईल पाठवून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. हे ॲप डाऊनलोड करताच एक विशेष मालवेअर मोबाईल मध्ये सक्रिय होतो आणि बँक खात्यातून पैसे टप्प्याने गायब होतात.
नाशिक मधील एका शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी पीएम किसान योजनेचे लिंक उघडतात. त्याच्या खात्यामधून तब्बल 2.5 लाख रुपये गायब झालेले आहेत. तसेच, एका बिल्डरने सायबर पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारीनुसार, त्याच्या खात्यामधून तब्बल 15 लाख रुपये नाहीसे झालेले आहेत.
हे पण वाचा | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! Pm kisan योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना होतोय मोठा फायदा
शेतकऱ्यांना इशारा बोगस लिंक आणि ॲप्स डाऊनलोड करू नका!
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांची फसवणूक APK फाईल च माध्यमातून केली जात आहे. ची फाईल डाऊनलोड करताच एक विशिष्ट प्रोग्रामच्या साह्याने शेतकऱ्यांचे मोबाईल पूर्ण हॅक केले जातात. परिणामी, संबंधित बँक खात्याशी लिंक असलेला मोबाईल नंबरचा गैरवापर करून सायबर गुन्हेगार संपूर्ण बँक खाते रिकामे करतो.
सायबर पोलिसांनी नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे. कोणत्याही अपरिचित लिंका किंवा APK फाईल उघडू नये किंवा डाऊनलोड करू नये. जर कोणत्याही अशा फाईल प्राप्त झाली तर लगेच डिलीट करावे.
सायबर पोलिसांचा तपास सुरू
या फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सायबर पोलीस विभागाकडून सखोल चौकशी सुरू आहे. पोलिसांनी अशा प्रकारच्या लिंक, फाईल आणि फसवणुकीच्या तंत्रज्ञानाच्या मागोवा घेतला असून या मागील मास्टरमाइंड शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
फसवणुकी पासून कसे वाचावे ?
- सर्वात प्रथम कोणतेही अपरिचित किंवा संशयास्पद लिंक उघडू नये.
- कोणत्याही अनोळखी APK फाइल्स डाऊनलोड करू नका.
- बँक खात्याशी लिंक असलेला मोबाईल मध्ये अनोळखी ॲप्स किंवा सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू नका.
- मोबाईल मध्ये अँटिव्हायरस सॉफ्टवेअर वापरा.
- कोणत्याही संशयास्पद संदेश किंवा कॉल आल्यास तात्काळ सायबर पोलिसांकडे तक्रार करा.
निष्कर्ष
सायबर गुन्हेगार सतत नवीन नवीन युक्त्या वापरून नागरिकांना गंडवत आहेत. तसेच शेतकरी बांधवांना देखील पीएम किसान योजनेच्या नावाखाली फसवले जात असल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिक सतर्क राहून कोणत्याही प्रकारच्या ब्राह्मक संदेशांना बळी पडू नये.
4 thoughts on “PM किसान योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक; सायबर गुन्हेगारांकडून लाखो रुपयांचा घोटाळा”