Pm Kisan Yojana: तुम्हीही नवीन जमीन घेतली आहे का? तर मग तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार का? वाचा सविस्तर


Pm Kisan Yojana: केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी सन्मान निधी योजना या दोन्ही योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळतो. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला एकूण बारा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही नियम व अटी पूर्ण कराव्या लागतात. तुमच्या मनात देखील हा प्रश्न आला असेल की तुम्ही नुकतीच एखादी जमीन खरेदी केली असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल का? तर याचे उत्तर काय असेल याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

पीएम किसान योजनेसाठी नवीन नियम काय आहेत?

पी एम किसन योजना 2019 साली सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी काही महत्त्वाचे नियम ठरवण्यात आले आहे.

हे पण वाचा| पीएम किसान योजनेच्या 20 व्या हप्त्याचे ₹2000 कधी मिळणार? शेतकरी मोठ्या चिंतेत!

  • जर तुम्ही 2019 नंतर जमीन खरेदी केली असेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही. 2019 पूर्वी ज्यांच्या नावावर जमीन होती शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येत आहे.
  • जर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्याकडून वारसा हक्काने जमीन मिळाले असेल तर मात्र तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल पण यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहे.
  • पती-पत्नी आणि त्यांच्या 18 वर्षावरील मुले या योजनेसाठी पात्र मानली जातात. यापैकी फक्त एकच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येतो. जर एखाद्या कुटुंबात पती-पत्नी दोघांचा नावावर जमीन असेल तरी फक्त एकालाच लाभ मिळतो.
  • जर तुम्ही सरकारी किंवा निमसरकारी नोकरी करत असाल किंवा आयकर भरत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येत नाही. Pm Kisan Yojana

थोडक्यात तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आहे जर तुम्ही नुकतीच म्हणजे 2019 नंतर जमीन खरेदी केली असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. वारसा हक्काने जमीन मिळाले असेल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ मिळेल. एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला लाभ मिळणार आहे. या नियमामुळे अनेक गरजू शेतकऱ्यांना योजनेचा फायदा मिळतो आणि गैरवापर होण्यापासून रोखण्यासाठी मदत होते. तुम्हाला जर या योजनेबद्दल अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही सरकारी वेबसाईटवर भेट देऊ शकता.

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!