PM किसान योजनेचा 20वा हप्ता या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार, पण या शेतकऱ्यांना मिळणार नाही काय आहे कारण

PM Kisan Yojana Hapta News : देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि टेन्शन वाढवणारी बातमी समोर आलेली आहे. जर तुम्हाला देखील पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता सुरू ठेवायचा असेल तर काही गोष्टी जाणून घ्या नाहीतर तुम्हाला पुढचा हप्ता मिळणार नाही नंतर पश्चाताप करत बसाल.

शेतकऱ्यांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना म्हणजे आपल्या शेतीच्या खर्चासाठी सरकारकडून मिळणारा थोडासा आधार. वर्षातून तीन वेळा येणारा हप्ता – एप्रिल जुलै, ऑगस्ट नोव्हेंबर आणि डिसेंबर मार्च या कालावधीमध्ये सरकार थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे हफ्ते जमा करतं. आता 19 वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात जमा झाल्यानंतर सगळ्यांना आतुरता लागली राहिली आहे ती पुढच्या हप्त्याची म्हणजे 20 वा हप्ता कधी जमा होणार? तर तुमच्यासाठी खुशखबर आलेली आहे. केंद्र सरकारकडून लवकरच महिन्यामध्ये हा हप्ता जमा केले जाणार आहे, असा अंदाज वर्तवला जातोय.PM Kisan Yojana Hapta News

हो, पण सगळ्यांच्या खात्यावरती हे पैसे येणार नाहीत, कारण काही नियम आणि तपशील अद्यावत नसतील तर पैसे थांबू शकतात त्यामुळे शेतकरी बांधवांनो ही बातमी सविस्तर वाचा नाहीतर तुम्हाला पुढचा हप्ता मिळू शकत नाही. नंतर पश्चाताप करण्यापूर्वी आत्ताच ह्या गोष्टीची पूर्तता करून ठेवा.

गावातली नाना म्हणाले, “माझं नाव यादीत नव्हतं, पण शेजारच्याच होत. मला वाटलं सरकारकडून भेदभाव होत आहे. पण नंतर कळालं की मी eKYC केलीच नव्हती” ही गोष्ट इतकी खरी आहे की आज लाखो शेतकरी याच कारणाने हप्ता मिळण्यापासून वंचित राहत आहेत.

सरकारने या आधी देखील स्पष्ट केलेले आहे eKYC जर पूर्ण नसेल, तर आत्ता मिळणार नाही तसेच आधार कार्ड बँक खात्यात लिंक नसेल, बँक खात्याची माहिती चुकीची असेल, तर हप्ता थांबवला जाईल. कधीकधी IFSC कोड देखील चुकतो, त्यामुळे खाते बंद झाले असतं. मग सरकारकडून पैसे पाठवले तरी बँकेत पोहोचत नाहीत. एकदा ताईचं नाव यादीत आलं होतं, पण बँकेने सांगितलं की “खाते बंद झाले आहे, नवीन माहिती द्या” मंग त्यांनी CSC केंद्रावर जाऊन अपडेट केला आणि पुढच्या वेळी त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले.

तुमचं नाव आहे का पण यादीत?

दिलेल्या सर्व कागदपत्रांच्या गोष्टी आपण चेक करून पाहिल्या पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं नाव गाजत आहे का हे तपासलं का? त्यासाठी कोणत्याही गावातल्या नीट असलेल्या मुलाला किंवा दुकानातल्या माणसांना सांगा pmkisan.gov.in या वेबसाईटवर जाऊन ‘लाभार्थी यादी’ मध्ये राज्य, जिल्हा, तालुका, गाव टाकून ‘Get Report’ यावरती क्लिक करा. यानंतर तुमचे यादीच नाव दिसलं, की खात्री पटेल. त्यात नसेल, तर अर्ज माहिती आणि केवायसी ताबडतोब पूर्ण करून घ्या.

आपल्या देशाचा आर्थिक कन्ह हा शेतीवरच्या अवलंबून आहे आणि शेती करणे आजच्या काळात मातीत राबणं नाही, तर कागदपत्रात ही शहाणपण होणे गरजेचे झालाय. कारण सरकारने कितीही योजना आणल्या, पण त्यासाठी आधार, मोबाईल नंबर लिंक, बँकेचे खाते नंबर योग्य असणे, आणि हो, घरात कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तर त्या कुटुंबाला योजनेचे लाभ मिळत नाही ही गोष्टी देखील लक्षात ठेवा.

तर शेतकरी बांधवांनो, जुन महिन्यात येणारा विश्व हप्त्यासाठी तुम्ही सज्ज आहात का? तुमचं नाव यादीत आहे का? eKYC झाली आहे का? आणि बँकेची माहिती योग्य आहे का? हे तात्काळ तपासा. पुढचा आता तुमच्या खात्यामध्ये येणारच नाही नुसतं वाट बघत बसाल. जर काही अडचण असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता.

हे पण वाचा |Pm किसान योजनेचा 20 वा हप्ता या तारखेला मिळणार आली मोठी अपडेट समोर

Leave a Comment

error: Content is protected !!