PM Kisan Yojana: देशभरातील करोडो शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या योजनेच्या 20व्या हप्त्याची लाभार्थी शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान याबाबतच एक महत्त्वाची आणि दिलासा देणारे बातमी समोर आली आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 19 हफ्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून आता 20 वा हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या योजनेची लाभार्थी यादी प्रसिद्ध असावी याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
20वा हप्ता कधी जमा होणार?
मिळालेल्या माहितीनुसार 18 किंवा 19 जुलै 2025 रोजी 20व्या हप्त्याचे 2000 रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 18 जुलै रोजी बिहारच्या मोती हिरा दौऱ्यावर असतील आणि तिथूनच विसाव्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतील अशी चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत घोषणेची वाट पहावी.
जर नरेंद्र मोदी यांनी बिहार दौऱ्यावरून हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले तर तुम्हाला 20व्या हप्त्याचे रक्कम मिळण्यासाठी अवघे 2 दिवस शिल्लक राहिले आहेत. तर त्यासाठी काही आवश्यक गोष्टी तातडीने पूर्ण कराव्या लागतील. ज्या शेतकऱ्यांनी अजूनही खालील नमूद केलेल्या गोष्टी पूर्ण केल्या नसतील तर त्यांना 20 व्या हप्त्याच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते.
E–Kyc पूर्ण करा: पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचा म्हणजे तुम्ही पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर जाऊन ओटीपी द्वारे किंवा सीएससी केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने ई–kyc प्रक्रिया पूर्ण केलेली असावी. जर तुम्ही केवायसी पूर्ण केलेली नसेल तर तुम्हाला 20वा हप्ता मिळणार नाही.
बँक तपशील तपासा: तुमचे आधार तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेले आहे का हे तपासणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. खात्यातील आयएफसी कोड खाते क्रमांक आणि इतर माहिती योग्य आहे का हे एकदा तपासून घ्या. काही चूक आढळल्यास ती त्वरित दुरुस्त करून घ्या.
हे पण वाचा| यावर्षी कापसाला किती भाव मिळणार? जाणून घ्या सविस्तर माहिती..
लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव आहे का? असे तपासा
- सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
- Beneficiary list या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचे राज्य जिल्हा तालुका आणि गाव निवडा.
- यानंतर तुम्हाला यादीत तुमचे नाव दिसेल.
फार्मर आयडी असणे आवश्यक
पीएम किसान योजनेच्या 20 व्या हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. सरकारने या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी फार्मर रजिस्ट्रेशन अनिवार्य केले आहे. यासाठी तुम्ही राज्य पोर्टलवर किंवा सीएससी केंद्रावर अर्ज करून तुमचे फार्मर रजिस्ट्रेशन पूर्ण करून घेऊ शकता. PM Kisan Yojana
पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षासाठी 6000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम 3 समान हफ्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2000 रुपये याप्रमाणे जमा केली जाते. एप्रिल ते जुलै या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना पहिला हप्ता दिला जातो. त्यानंतर ऑक्टोबर ते नोव्हेंबर या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना दुसरा हप्ता दिला जातो. डिसेंबर ते मार्च या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना तिसरा हप्ता दिला जातो. अशा पद्धतीने शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपयाचा लाभ या योजनेअंतर्गत मिळतो.
यापूर्वी पी एम किसान योजनेअंतर्गत 19 वा हप्त्याचा लाभ 24 फेब्रुवारी 2025 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुमारे 9.8 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 22000 कोटी रुपयांचा निधी वितरित केला होता. आता 20 व्या हप्त्याला किती निधी लागेल व किती शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता मिळेल? हे पाहण्यासारखे आहे.
लाभार्थी स्टेटस कसे तपासावे?
पी एम किसान योजनेचे लाभार्थी टेटस तुम्ही पी एम किसान योजनेचे अधिकृत वेबसाईटवर जाऊन तपासू शकतात. या योजनेचा 20 वा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला की नाही याची खात्री तुम्ही या द्वारे करू शकता. यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जाऊन beneficiary status या पर्यावर क्लिक करावे लागेल. यामध्ये तुमच्या खात्यात पैसे आले आहे का नाही? याची सर्व माहिती मिळेल. लाभार्थी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर सर्व आवश्यक कामे पूर्ण करावीत, लाभार्थी यादीत नाव तपासावे जेणेकरून तुम्हाला 20वा हप्ता वेळेवर मिळेल आणि पुढील हप्त्यामध्ये कोणतेही अडचण निर्माण होणार नाही.
1 thought on “खुशखबर! पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे 2,000 रुपये या दिवशी खात्यात जमा होणार? लाभार्थी यादीत तुमचे नाव आहे का? तपासा”