पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे ₹2,000 या तारखेला खात्यात जमा होऊ शकतात. जाणून घ्या सविस्तर ..

PM Kisan Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान मीडिया रिपोर्टनुसार पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 18 जुलै रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहार मधून वितरित केला जाऊ शकतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 18 जुलै रोजी बिहार दौऱ्यावर जाणार आहेत. दरम्यान त्या ठिकाणावरून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 20व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा केला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र सरकारने याबाबत अजून अधिकृत घोषणा केलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत घोषणेची वाट पाहावी.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचे आर्थिक मदत दिली जाते. ही मदत तीन समान हफ्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये महाडीबीटी द्वारे जमा केली जाते. तुम्ही जर या योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्हाला पुढील हप्त्याची प्रतीक्षा असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टी त्वरित करणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने सोशल मीडियावर याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यामुळे या सूचनेकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. 20वा हप्ता मिळवण्यासाठी कोणती कामे पूर्ण करावी लागणार याबाबत आपण जाणून घेऊया.

हे काम पूर्ण करा.. तरच मिळेल 20वा हप्ता

केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे ज्या शेतकऱ्यांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांचे पैसे अडकू शकतात किंवा रद्दही होऊ शकतात. त्यामुळे खालील गोष्टी तपासून घ्या आणि आवश्यक असल्यास त्या पूर्ण करा. PM Kisan Yojana

ई केवायसी करणे अनिवार्य:

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई केवायसी करणे आवश्यक आहे. तुम्ही पी एम किसान योजनेच्या पोर्टल वर जाऊन ओटीपी आधारे ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात. जर तुम्हाला बायोमेट्रिक ई केवायसी करायची असेल तर जवळील सीएससी सेंटरला भेट द्या.

हे पण वाचा| सोन्याच्या किमतीत मोठा उलटफेर! जाणून घ्या 10 ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागणार?

आधार आणि बँक खाते लिंक असणे आवश्यक:

तुमचा आधार क्रमांक तुमच्या सक्रिय बँक खात्याशी लिंक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर ते लिंक नसेल तर तुम्हाला पुढील हप्त्याचे पैसे जमा होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे लगेच बँकेत जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या.

बँक डिटेल्स ची खात्री करा:

तुमच्या बँक खात्याचा क्रमांक आणि आयएफसी कोड योग्य आहे का नाही हे तपासा. बँक डिटेल्स चुकीची असल्यास तुमचे ट्रांजेक्शन फेल होऊ शकते एकदा बँकेच्या पासबुक वरून याची सर्व डिटेल खात्री करून घ्या.

जमिनीच्या कागदपत्राची पडताळणी:

तुमच्या जमिनीच्या नोंदीमध्ये काही चूक आहे का किंवा कागदपत्रे अपूर्ण आहेत का ते तपासा. काही अडचण आल्यास त्वरित स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधा आणि ती दुरुस्त करून घ्या अन्यथा तुमची पात्रता रद्द होण्याची शक्यता वर्तवली जाते.

लाभार्थी स्टेटस तपासा:

तुम्ही या योजनेसाठी लाभार्थी यादीत आहेत का नाही याची खात्री करून घ्या. तुम्हाला मागील आप्ते मिळाले आहेत का आणि तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

मोबाईल नंबर अपडेट करा:

तुमच्या जुन्या मोबाईल नंबर वर ओटीपी किंवा योजनेसंबंधीची माहिती मेसेज मिळणार नाहीत त्यामुळे तुमच्या सध्याच्या चालू असलेला मोबाईल नंबर वेबसाईटवर अपडेट करा.

या सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण केल्यास तुम्हाला पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता मिळण्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही आणि तुमचे पेमेंट थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!