पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता कधी मिळणार? लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव आहे का? जाणून घ्या मोबाईलवर


PM Kisan Yojana: देशातील करोडो शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 19 हप्ते लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले गेले आहेत. यानंतर सध्या शेतकरी या योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहार दौऱ्या दरम्यान 24 फेब्रुवारी 2025 रोजी या योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला गेला होता. देशातील अल्पभूधारक व गोरगरीब शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत म्हणून केंद्र सरकार अंतर्गत ही योजना राबवली जाते. या योजनेत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. ही सहा हजार रुपये रक्कम शेतकऱ्यांना दर चार महिन्याच्या अंतराने दोन हजार रुपयांच्या हप्त्यांमध्ये तीन समान हप्त्यात दिली जाते. शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत 19 वा हप्ता मिळाल्यानंतर आता विसाव्या हाताची आतुरता लागली आहे.

लाभार्थी यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा

ई केवायसी करणे आवश्यक

देशातील शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे पैसे नेमकं कधी मिळणार याची तारीख अजून जाहीर झालेली नाही. विसावा हप्ता पुजारी करण्याच्या काही दिवस अगोदर सरकार ही तारीख जाहीर करेल. या योजनेची रक्कम शेतकऱ्यांना एप्रिल जुलै, ऑगस्ट नोव्हेंबर, डिसेंबर मार्च या कालावधीमध्ये वर्षातून तीन वेळा हे पैशे शेतकऱ्यांना मिळतात. योजनेअंतर्गत मिळणारे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केले जातात. या योजनेचा विसावा हप्ता जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पी एम किसान योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी, नोंदणी शेतकऱ्यांना ओटीपी आधारित ई-केवायसी प्रक्रिया करणे अति आवश्यक आहे.

हे पण वाचा महाराष्ट्राच्या हवामानाबाबत मोठी बातमी! राज्यावरती पुन्हा दुहेरी संकट! या सहा जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

पीएम किसान योजनेची लाभार्थी यादी कशी तपासावी?

  • सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • त्यानंतर beneficiary list या पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुमच्यासमोर नवीन पेज उघडे त्यामध्ये राज्य जिल्हा उपजिल्हा ब्लॉग आणि गाव निवडा असे ऑप्शन दिसतील.
  • विचारलेली सर्व माहिती अचूक भरवा आणि गेट रिपोर्ट या बटणावर क्लिक करा.
  • तुमच्या भागातील सर्व लाभार्थी यादी तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
  • यामध्ये तुम्ही तुमचे नाव शोधू शकता. PM Kisan Yojana

हे पण वाचा Ration Card KYC : रेशन कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी! पंधरा दिवसात हे काम करा अन्यथा रेशन कार्ड होणार बंद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या आर्थिक मदत साठी केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश देशातील गोरगरीब शेतकऱ्यांना आर्थिक मदत प्रदान करणे आहे. या सन्माननिधीतून शेतकरी त्यांच्या शेतीसंबंधीतील दैनंदिन गरजा भागवू शकतील या हेतूने ही योजना सुरू करण्यात आली आहे. वार्षिक सहा हजार रुपये रक्कम जरी थोडी दिसत असली तरी देशातील अनेक गोरगरिबांच्या जीवनमानाचा आधार बनले आहे. या योजनेला देशातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता कधी मिळणार? लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव आहे का? जाणून घ्या मोबाईलवर”

Leave a Comment

error: Content is protected !!