Pm Kisan Yojana 20th Hapta News: मोठी बातमी आली समोर! या तारखेला येणार पी एम किसान योजनेचा हप्ता?

Pm Kisan Yojana 20th Hapta News : उन्हाळ्याचे कडक दिवस आणि शेतीची मशागत दोन्ही सुरू झालेला आहे. हवामान खात्याने यावर्षी सात जून पासून मान्सूनला सुरुवात होणार असा अंदाज वर्तवल्याने शेतीतले काम करण्यास शेतकऱ्यांनी भर दिलेली आहे. त्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. केंद्र सरकारच्या “पीएम किसान सन्मान निधी योजनेचा” १९ वा हप्ता जून महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार अशी संकेत प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून मिळाले. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी एक मोठा हातभार लागू शकतो. Pm Kisan Yojana 20th Hapta News

या योजनेअंतर्गत दरवर्षी तीन हप्त्यात 6000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जातात. प्रत्येक हप्ता ₹2000 रुपयांचा असतो आणि तो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जातो. यापूर्वी शेतकऱ्यांना 19 मार्च हा फेब्रुवारी महिन्यामध्ये जमा करण्यात आला होता 24 फेब्रुवारी 2025 रोजी शेतकऱ्यांना हा आता व्यतिरिक्त करण्यात आल्यानंतर आता शेतकऱ्यांना पुढच्या हप्त्याची आतुरता लागलेली आहे.

शासनाच्या माध्यमातून या योजनेची सुरुवात 2019 मध्ये करण्यात आली होती आणि त्यानंतर आतापर्यंत 19 हप्ते दिले गेले आहेत. देशभरातील 9.8 कोटी हून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. यामुळे या रकमेतून शेतकऱ्यांना शेती संबंधित बियाणं, खते, आणि कीटकनाशक घेण्यासाठीची चिंता काहीशी कमी झालेली आहे. जर शेतकऱ्यांच्या खात्यावरती 20 वा हप्ता खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी मिळाला तर एक मोठा दिलासा त्यांना मिळणार आहे.

या तारखेला होणार हप्ता जमा

मागच्या वेळेस शेतकऱ्यांना 19 वा हप्ता हा 24 फेब्रुवारी 2025 रोजी झाला होता म्हणजे योजनेच्या नियमानुसार दर चार महिन्यांनी हा हप्ता जमा केला जातो आता पुढील हप्ता जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाण्याची शक्यता आहे. परंतु अद्याप शासनाकडून कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही.

लाभार्थी यादीत नाव तुम्हाला

  • सर्वात प्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • त्यानंतर तिथे दिलेल्या फार्मर कॉर्नर या विभागात जाऊन बेनिफिशेरी लिस्ट वर क्लिक करा.
  • नंतर तुमचा राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा.
  • त्यानंतर गेट रिपोर्ट या बटनावरती क्लिक करून यादी डाऊनलोड करा.
  • यात तुमचं नाव असल्यास तुम्ही लाभार्थी यादीमध्ये पात्र असणार आहात आणि पुढचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे

खर शेतकऱ्यांना जर 20 वा आता मिळाला तर त्यांना खरीप हंगामातील हंगामासाठी ही रक्कम उपयोगी पडणार आहे. कारण मशागतीसाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खर्च लागत असतो कुठे तरी शेतकऱ्यांना हा एक मोठा हातभार असणार आहे. आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरंच जून महिन्यामध्ये हा हप्ता जमा होणार का याकडे पाहण्यासारखे राहणार आहे.

हे पण वाचा | Pm किसान योजनेचा 20 वा हप्ता या तारखेला येणार? आली मोठी अपडेट समोर, वाचा सविस्तर

Leave a Comment

error: Content is protected !!