Pm Kisan Yojana 20th Hapta: शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकारने सुरू केलेल्या PM किसान सन्मान निधी योजनेचा विश्वा हप्ता मिळवण्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांची उत्सुकता वाढलेली आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये 19 वा हप्ता जमा झाला आणि आता सगळेजण वाट पाहत आहेत पुढच्या हप्त्याची! चला तर मग जाणून घेऊया नेमकं काय आहे अपडेट आणि कोणती प्रक्रिया फॉलो करावी लागणार पुढचा हप्ता मिळवण्यासाठी जाणून घेऊया सविस्तर माहिती.Pm Kisan Yojana 20th Hapta
Pm किसान योजना म्हणजे काय?
2019 मध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही योजना सुरू करण्यात आली. आर्थिक दृष्टात दुर्बल आणि लहान शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये, म्हणजे दरवर्षी एकूण सहा हजार रुपये थेट बँक खात्यामध्ये जमा केले जातात. आर्थिक रक्कम डीबीट अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होते.
20 वा हप्ता कधी मिळणार?
मागच्या वेळेस शेतकऱ्यांना हप्ता दर चार महिन्यांनीच मिळाला आहे तर मागच्या काही वेळेचा विचार केला तर अठरावा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 ला आला होता आणि 19 वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 ला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला होता.
त्याचा अंदाजावरून आपण गृहीत धरले तर 20 वा हप्ता जून 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. सरकारकडून अद्याप कोणती अधिकृत तयारी जाहीर करण्यात आलेली नाही, पण नेहमीसारखा चार महिन्यांच्या अंतराचा ट्रेंड बघता हे जवळपास निश्चित आहे.
पीएम किसानचा हप्ता मिळवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागणार पूर्ण
जर तुम्हालाही अजून या योजनेचा लाभ मिळाला नसेल आणि पुढचं हप्ता मिळवायचा असेल तर काही गोष्टी पूर्ण करावे लागणार आहे त्यासाठी तुमची E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागेल त्यासाठी खाली दिलेली प्रक्रिया पूर्ण करा.
- अधिकृत वेबसाईटवर ला भेट द्या.
- त्यानंतर फार्मर कॉर्नर वर क्लिक करा.
- इ केवायसी पर्याय निवडा.
- तुमचा आधार नंबर टाका आणि Get OTP क्लिक करा.
- मोबाईलवर आलेला OTP टाका आणि प्रक्रिया पूर्ण करा.
- या सर्व गोष्टीसाठी तुम्हाला आधार कार्ड, बँक खात्याची माहिती, जमीनदार प्रमाणपत्र ( 7/12 उतारा)
हे देखील लक्षात ठेवा की e-KYC न झाल्यास पुढचा हप्ता अडकू शकतो. त्यामुळे जेव्हा सरकारकडून अधिकृत घोषणा होईल, त्या आधीच सगळी प्रोसेस पूर्ण ठेवणे फायद्याचा ठरेल.
Disclaimer : नमस्कार मित्रांनो अद्याप सरकारकडून 20 व्या हप्ताबाबत कोणती अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. ही माहिती फक्त आणि मागच्या काही हप्त्याच्या अंदाजे दिलेले आहे. माहिती कुठलीही घोषणाच्या आधारे बनवली नाही. योग्य माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत घोषणाकडे लक्ष ठेवा.
हे पण वाचा | PM किसान योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक; सायबर गुन्हेगारांकडून लाखो रुपयांचा घोटाळा