Pm Kisan Yojana : 24 फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार ₹2000 रुपये, यादीत नाव तपासा

Pm Kisan Yojana : देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. केंद्र सरकार अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना 6000 रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते. आता याच योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. हा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. परंतु शेतकऱ्यांना त्यापूर्वी यादीमध्ये ना तपासणी काही महत्त्वाच्या गोष्टी पूर्ण करणे गरजेचे आहे अन्यथा त्यांना हा हप्ता मिळणार नाही.Pm Kisan Yojana

शेतकऱ्यांच्या खात्यावरती ₹2000 हजार रुपये कधी येणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चोवीस फेब्रुवारी रोजी बिहार इथून शेतकऱ्यांच्या खात्यावरती 19व्या हफ्तेचे रक्कम जमा करण्यात येणार केंद्रीय कृषिमंत्री शिवराज चव्हाण यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती दरवर्षी सहा हजार रुपये जमा केले जातात हे तीन हप्त्यांमध्ये समान पैसे वाटप केले जाते.

योजनेचा लाभ घेण्यासाठी हे काम करा

पंतप्रधान सन्मान योजना 1976 मिळवण्यासाठी काही महत्त्वाचे नियम लागू करण्यात आलेले सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी त्यांची ई- केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. जर एखाद्या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण केली नाही तर त्यांच्या खात्यावरती हा लाभ जमा होणार नाही.

केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन प्रक्रिया पूर्ण यासाठी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक जवळ असणे आवश्यक आहे. आणि ही प्रक्रिया मोबाईल किंवा जवळच्या CSC वर जाऊन पूर्ण करता येईल.

योजनेत झाले महत्त्वाचे बदल !

Pm Kisan योजने संदर्भामध्ये सरकारने काही महत्त्वाचे बदल केलेले आहेत. याआधी एका कुटुंबातील अनेक सदस्यांना या योजनेचा लाभ मिळत होता. मात्र नवीन नियमानुसार, आता फक्त एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजे जर पती-पत्नी मुलगा किंवा मुलगी एकत्र या योजनेसाठी पात्र असतील तर त्यातील फक्त एकाच व्यक्तीला लाभ मिळणार आहे इतर सदस्यांना या योजनेमधून वगळले जाणार आहे.

हे पण वाचा | Pm kisan ई -kyc केली तरच शेतकऱ्यांना मिळणार योजनेचा 19 वा हप्ता

कोण पात्र आणि कोण अपात्र ?

Pm Kisan योजनेसाठी फक्त लहान आणि सीमत शेतकरी पात्र आहेत. व केंद्र किंवा राज्य सरकारचे कर्मचारी अपात्र, सध्याचे किंवा माजी खासदार आणि आमदार, डॉक्टर, अभियंते, वकील, चार्टर्ड अकाउंट आणि इतर व्यवसायिक ज्या शेतकऱ्यांकडे पाच एकर पेक्षा जास्त शेत जमीन आहे ते शेतकरी अपात्र.

Pm किसान योजनेची लाभार्थी यादी !

पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता लाभ मिळेल की नाही हे जर तपासायचा असेल तर सर्वप्रथम तुम्ही pm Kisan योजनेच्या पोर्टलवर जाऊन लाभार्थी यादी तुमचे नाव तपासा. यासाठी तुम्हाला pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. नंतर शेतकरी कॉर्नर विभागात जा आणि लाभार्थी यादीवरती क्लिक करा.

2 thoughts on “Pm Kisan Yojana : 24 फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार ₹2000 रुपये, यादीत नाव तपासा”

Leave a Comment

error: Content is protected !!