शेतकऱ्यांनो, तुमच्या खात्यात आले का? ₹2000 रुपये इथे चेक करा, वाचा सविस्तर

Pm Kisan Yojana 19th Hpta : आज देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार रुपये जमा केलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. अनेकदा शेतकरी प्रश्न विचारत होते की 19 वा हप्ता कधी जमा होणार. आज बिहारीतून एका कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा केलेला आहे. तुमच्या खात्यावरती पैसे आले का कशा पद्धतीने चेक कर ना व किती रुपये जमा होणार याबाबत आपण सविस्तर माहिती आज जाणून घेणार आहोत. Pm Kisan Yojana 19th Hpta

देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देण्यासाठी केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु केली या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही मदत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येते. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 18 हप्ते जमा झालेले आहेत आता 19 व हप्ता देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केलेला आहे. त्यामुळे तुम्ही तुमची स्थिती कशी तपासू शकता याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत

या योजनेचा लाभ कोणाला मिळणार

या योजनेचा लाभ राज्यातील दोन हेक्टर पर्यंत शेतीत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकरी कुटुंबात पती-पत्नी आणि अल्पवयीन मुले असतील तर या योजनेचा फक्त लाभ एकाच सदस्यांना दिल्या जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे.

कोणते शेतकरी पात्र नाहीत ?

या सरकार योजनेचा लाभ फक्त गरजू व गरीब शेतकऱ्यांना दिला जातो. सरकारी नोकरी करणारी किंवा पेन्शन घेणारे शेतकरी विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार, मंत्री, महापौर, डॉक्टर, अभियंते, वकील, चार्टर्ड अकाउंटंट असे व्यवसायिक ज्यांच्या नावावरती व्यावसायिक जमीन किंवा संस्थानिक जमीन आहे. मागील आर्थिक वर्षामध्ये आयकर रिटर्न भरणारे शेतकरी तर तुम्ही यापैकी कोणत्याही एका श्रेणीत येत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.

हे पण वाचा | आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती ₹2000 हजार रुपये जमा होणार, लाभार्थी यादीत नाव तपासा

तुमच्या खात्यामध्ये जमा झाले का ₹2000 रुपये तपासा

सर्वात प्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेचा अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल, त्यानंतर तिथे लाभार्थी पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करा. तुमचा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक प्रविष्ट करा. त्यानंतर डेटा मिळवा वर क्लिक करा. आता तुमची टेटस तुमच्यासमोर येईल, तुमच्या खात्यात हा हप्ता पाठवला गेला आहे का नाही चेक करा.

2 thoughts on “शेतकऱ्यांनो, तुमच्या खात्यात आले का? ₹2000 रुपये इथे चेक करा, वाचा सविस्तर”

Leave a Comment

error: Content is protected !!