Pm Kisan Update | पीएम किसान योजनेचा अर्ज करायचाय? तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. या तारखेपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया

Pm Kisan Update | शेतकरी बांधवांसाठी (Big update for farmers) एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. ती म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान (PM Kisan Yojana News) निधी योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा एक मोठी संधी देण्यात येणार आहे. शासनाने याबाबत एक मोठी घोषणा केली असून, नवीन शेतकऱ्यांना या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी एक संधी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना वार्षिक ₹2000 हजार रुपयांचा हप्ता देण्यात येणार आहे. यासाठी 15 एप्रिल पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रोसेस जाणून घेण्यासाठी खालील दिलेली माहिती वाचा. Pm Kisan Update

Agriculture News : केंद्रशासन शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देण्यासाठी 2019 मध्ये पीएम किसन (Pm Kisan Yojana) नावाची योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6000 ((PM Kisan Yojana ₹6000/- Installment Rs.) लाभ देण्यात येतो. परंतु काही कारणास्तव, अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहत आहेत. हि गोष्ट लक्षात घेता शासनाने याबाबत निर्णय घेतलेला आहे. यासाठी 15 एप्रिल पासून पी एम किसान योजनेची(PM Kisan Yojana application process begins) नव्याने नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे, परंतु जे शेतकरी आधीच लाभ घेत आहे त्यांना नवीन नोंदणी करायची कोणतीही गरज नाही.

शेतकऱ्यांच्या खात्यावरती 19 हप्त्याचे वितरण झाल्यानंतर, आता लवकरच 20 वा हप्ता देखील जाहीर केला जाणार आहे. हा हप्ता वितरित होण्यासाठी, काही काळ असल्याने शेतकऱ्यांसाठी एक संधी देण्याचा विचार सरकारने केलेला आहे. यासाठी शासनाच्या माध्यमातून नवीन अर्ज प्रक्रिया सुरू केलेली आहे.

शेतकऱ्यांच्या अडचणी (Farmers’ problems)

सध्या ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत काही गोष्टी पोहोचल्या नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे किंवा बँकातील काही (E-KYC process must be completed, name mistake in the bank, Aadhaar card not linked to the bank, etc.) चुका मालकी हक्कातील बदल, किंवा शेतकऱ्यांच्या मृत्यू अशा विविध कारणांमुळे लाभ मिळत नाही. काही वेळा शेतकऱ्यांना सुरुवातीची आपली मिळाले आहेत परंतु नंतर थांबलेले आहेत. यासाठी अनेक शेतकऱ्यांनी, तहसीलदार जिल्हा कार्यालय तलाठी यांच्याकडे पाठपुरावा केलेला आहे.

याच पार्श्वभूमीवर तलाठी, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये पाठपुरावा केला होता. यानंतर शासनाने नवीन नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे देशातील लहान शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. अर्ज करत असताना शेतकऱ्यांनी योग्य माहिती भरणे आवश्यक आहे. जसे की राज्य किंवा केंद्र सरकारच्या जमीन नोंदणी प्रणालीमध्ये नोंदणी असणे गरजेचे. तर बँक खाते, आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक योजनेची लिंक असणे आवश्यक आहे.

असा करा अर्ज (Apply for PM Kisan Yojana)

अर्ज करण्यासाठी तुम्ही दोन पर्यायांचा वापर करू शकता. एक ऑनलाईन पद्धतीने दुसरी ऑफलाइन पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी https://pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरती भेट द्या.

ऑफलाईन अर्ज असा करा (How to apply offline)

सर्वात प्रथम, कृषी कार्यालय किंवा CSC केंद्रावरती जाऊन अर्ज सादर करता येतो. तसेच तुम्ही गावातील तलाठी कार्यालयात देखील अर्ज करू शकता. परंतु शासनाने जाहीर केलेल्या या माहितीमध्ये अर्जदारांना मागील हप्ते मिळणार की नाही, याबाबत कुठलीही पष्टता देण्यात आलेली नाही. तर आगामी लाभ निश्चित मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे ही शेतकऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी असू शकते. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज करावे अशी आवाहन शासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

हे पण वाचा | घरबसल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेची ई-केवायसी कशी करावी? जाणून घ्या सविस्तर..

Leave a Comment

error: Content is protected !!