Pm Kisan Scheme : 24 फेब्रुवारी रोजी 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार, लाभार्थ्यांची नाव चेक करा

Pm Kisan Scheme : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेचा 19 वा हप्ता हा 24 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. राज्यातील सुमारे 92 लाख 55 हजार शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहे. त्यापूर्वी तुमची यादी मध्ये नाव आहेत का हे चेक करून घ्या. Pm Kisan Scheme

‘PM Kisan’ योजनेचा 19 वा हप्ता लवकरच

PM Kisan योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना वार्षिक ₹6000 रुपये दिले जातात. हि रक्कम चार महिन्यांच्या अंतराने तीन हप्त्यांमध्ये दिली जात आहे. वेळापत्रकानुसार, 19 वा हप्ता डिसेंबर 2024 ते मार्च 2025 या कालावधीमध्ये वितरित होणार आहे.

शेतकरी मित्रांनो, या योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी बिहारच्या भागलपुर जिल्ह्यात 24 फेब्रुवारी रोजी शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा हप्ता हस्तांतरित करण्यात येणार आहे. अशी माहिती कृषिमंत्री व केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून प्रसार करण्यात आलेले आहे.

मागील हप्त्याचे वितरण आणि महाराष्ट्रातील लाभार्थी

या योजनेचा अठरावा हप्ता 5 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला होता. महाराष्ट्र वाशिम येथील शेतकरी मेळाव्यातून हा आता वितरित करण्यात आलेला यावेळी देशभरातील नऊ कोटी चाळीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 20000 कोटी रुपये जमा करण्यात आलेले होते. त्यापैकी महाराष्ट्रातील 91 लाख 35 हजार शेतकऱ्यांना 1,889 कोटी रुपये मिळाले आहेत.

हे पण वाचा | किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळत आहे 5 लाख रुपये कर्ज; अर्ज कसा करावा? पहा सविस्तर..

Pm kisan योजनेच्या आवश्यक अटी

या योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारने काही महत्त्वाच्या अटी लागू केलेले आहेत.

  • लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ घेण्यासाठी E-KYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
  • अद्यावत भूमी अभिलेख असणे आवश्यक आहे.
  • आधार कार्ड बँक खाते लिंक असणे आवश्यक आहे.

राज्य शासनाने या अटी पूर्ण करण्यासाठी अनेक मोहीम राबवलेल्या आहेत. सध्या राज्यातील 96 लाख 99 हजार शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण केलेली मात्र अजूनही चार लाख शेतकरी या अटीमध्ये बसत नसल्याचे दिसून आलेले आहे.

देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक लाभ!

Pm Kisan योजनेअंतर्गत केंद्र सरकारने आत्तापर्यंत 11 कोटी शेतकऱ्यांना तीन लाख कोटी रुपयाहून अधिक रक्कम हस्तांतरित केलेली आहे. ही रक्कम शेतकऱ्यांना थेट डीबीटी अंतर्गत मिळत आहे.

शेतकऱ्यांनी Pm Kisan योजनेची स्थिती कशी तपासावी?

शेतकरी आपल्या लाभाची स्थिती PM Kisan मोबाईल ॲप किंवा वेबसाईटवर तपासा शकता.

  • गुगल प्ले स्टोअर वरून पी एम किसान नावाचे ॲप डाऊनलोड करा.
  • नोंदणी क्रमांक टाका आणि ओटीपी मिळवा.
  • डॅशबोर्ड वर क्लिक करा आणि लाभार्थी पर्याय वर क्लिक करा.
  • तुमच्या खात्यात जमा झालेल्या हप्त्याची संपूर्ण माहिती मिळेल.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना

ज्या शेतकऱ्याने अद्याप त्यांची केवायसी प्रक्रिया, भूमि अभिलेख अद्यावत करणे आणि आधार कार्ड बँक खाते लिंक करणे या अटी पूर्ण केल्या नाहीत, त्यांनी लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करावी. अन्यथा त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.

निष्कर्ष

पीएम किसान योजनेचा १९ वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित होणार असून, महाराष्ट्रातील सुमारे 92 लाखहून अधीक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी आपली माहिती अपडेट करून खात्री करून घ्यावी, जेणेकरून त्यांना कोणतीही अडचणी येऊ नये. ही योजना शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक आधार बनवत आहे.

(नमस्कार मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी आजच आमचं व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर सरकारी योजना हवामान अंदाज आणि चालू घडामोडी विषयी माहिती मिळेल)

2 thoughts on “Pm Kisan Scheme : 24 फेब्रुवारी रोजी 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार, लाभार्थ्यांची नाव चेक करा”

Leave a Comment

error: Content is protected !!