घरबसल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेची ई-केवायसी कशी करावी? जाणून घ्या सविस्तर..

PM Kisan Samman Nidhi Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत देत आहे. ही योजना भारत सरकारची महत्वकांशी योजना आहे. जी देशातील शेतकऱ्यांना शेती संबंधित कामासाठी आर्थिक मदत प्रदान करते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. ही रक्कम दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये महाडीबीटी द्वारे ट्रान्सफर केली जाते. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून निधी दिला जातो. देशातील गोरगरीब शेतकऱ्यांकडे शेती योग्य जमीन आहे त्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.

पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती संबंधित कामासाठी आर्थिक मदत दिली जाते. मात्र ही आर्थिक मदत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना केवायसी करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी पूर्ण आहे त्यात शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत पुढील हप्त्याचा लाभ दिला जाणार आहे. या योजनेअंतर्गत बोगस लाभार्थी टाळण्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण केली जाते. या योजनेअंतर्गत दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी आणि शासकीय योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केवायसी अपडेट करणे आवश्यक आहे.

हे पण वाचा | शेतकरी ओळखपत्राचे फायदे काय? ओळखपत्र कसे काढावे? जाणून घ्या सविस्तर माहिती

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आत्तापर्यंत शेतकऱ्यांना 18 हप्ते देण्यात आले आहेत. या योजनेचा अठरावा हप्ता पाच ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांना देण्यात आला होता. यानंतर पुढील चार महिन्याच्या आत 19 वा हफ्ता शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना 19 व्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. दरम्यान 19 वा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांना मिळणार आहे. याबाबत केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी तारीख देखील सांगितले आहे. कृषिमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बिहार दौऱ्याला जाणार आहेत. दरम्यान प्रधानमंत्री 24 फेब्रुवारी 2025 रोजी देशातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 19 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये पाठवणार आहेत.

ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेअंतर्गत 19 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळवायचे आहेत त्या शेतकऱ्यांनी 24 फेब्रुवारी पर्यंत पीएम किसान योजनेची केवायसी करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर विसाव्या हफ्त्यापासून ज्या शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळखपत्र आहे त्यांनाच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ दिला जाणार असल्याची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य आणि गोरगरीब शेतकरी सीएससी केंद्राच्या बाहेर रांगेत उभे राहून शेतकरी ओळखपत्र काढण्याचा प्रयत्न करत आहेत. PM Kisan Samman Nidhi Yojana

हे पण वाचा | राज्य शासनाचा मोठा निर्णय! या शेतकऱ्यांना रेशनऐवजी मिळणार पैसे; पहा सविस्तर माहिती

घरबसल्या पीएम किसान योजनेची केवायसी कशी करावी?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची केवायसी तुम्ही घरी बसल्या करू शकतात. जर तुम्हाला घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने केवायसी करता आले नाही तर तुम्ही जवळील csc केंद्रात जाऊन ओटीपी द्वारे किंवा बोटाच्या ठस्स्याद्वारे ही केवायसी करू शकता. घरबसल्या केवायसी कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

  • सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर इ केवायसी या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • या ठिकाणी आधार क्रमांक टाका आणि गेट ओटीपी या पर्यायावर क्लिक करा.
  • मिळालेला ओटीपी त्या ठिकाणी टाका आणि तुमची केवायसी पूर्ण करून घ्या.
  • केवायसी पूर्ण झाल्याचा मेसेज तुम्हाला मिळेल.
  • केवायसी सोबतच या योजनेचा पुढील हप्ता मिळवण्यासाठी तुमचा आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक असणे देखील आवश्यक आहे.

जर ऑनलाईन ओटीपी द्वारे तुमची केवायसी पूर्ण होत नसेल तर तुम्ही सीएससी केंद्रात जाऊन किंवा जवळील बँक शाखेत जाऊन तुमची केवायसी अपडेट करू शकता.

हे पण वाचा | किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळत आहे 5 लाख रुपये कर्ज; अर्ज कसा करावा? पहा सविस्तर..

या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र आहेत?
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
  • या योजनेसाठी लहान आणि मध्यमवर्गीय शेतकरी पात्र आहेत.
  • ज्या शेतकऱ्यांकडे शेती करणे योग्य जमीन आहे त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जातो.
  • योजनेत नाव नोंदणी करताना आधार कार्ड बँक खाते आणि जमीन मालकीचे कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

हे पण वाचा | शेतकऱ्यांच्या खात्यात 19व्या हप्त्याचे 2,000 रुपये या दिवशी जमा होणार; यादीत तुमचे नाव आहे का नाही?

या योजनेसाठी कोण पात्र नाही?

ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी किंवा सेवानिवृत्त अधिकारी, डॉक्टर, वकील, सायंटिस्ट, सीए यासारख्या व्यावसायिक पदावर आहेत त्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे असे समजून त्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जात नाही. त्याचबरोबर जे शेतकरी आयकर भरत आहेत किंवा ज्यांच्याकडे दहा हजार रुपये पेक्षा जास्त पेन्शन आहे ते देखील या योजनेसाठी पात्र ठरत नाहीत.

हे पण वाचा | लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार! फेब्रुवारीचा हप्ता या तारखेला मिळणार

पी एम किसान योजनेत नाव कसे नोंदवावे?
  • पी एम किसान योजनेत नाव नोंदवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर न्यू फार्मर रजिस्ट्रेशन (new former registration) या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर आधार क्रमांक आणि विचारलेली इतर सर्व आवश्यक माहिती भरा.
  • बँक खाते आणि शेतीच्या जमिनीची सर्व माहिती भरा.
  • शेवटी फॉर्म सबमिट करा आणि अर्जाची स्थिती तपासा.
  • या प्रकारे तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेत तुमचे नाव नोंदवू शकता.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

6 thoughts on “घरबसल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेची ई-केवायसी कशी करावी? जाणून घ्या सविस्तर..”

Leave a Comment

error: Content is protected !!