PM-KISAN completes 19 Successful installment : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे. होळी पूर्वी शेतकऱ्यांचा खात्यावरती हे पैसे जमा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. तुमच्या खात्यात जमा झाले का हे कशा पद्धतीने चेक करणार हे आपण पाहणार आहोत. PM-KISAN completes 19 Successful installment
देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देण्यासाठी भारत सरकारने कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत मोठा उपक्रम राबवण्यात येत आहे. ज्याचा उद्दिष्ट शेतकऱ्यांच्या कृषी निविष्ठा आणि घरगुती गरजांसाठी आर्थिक गरजा पूर्ण करणे हे आहे.
देशाचे कृषिमंत्री यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेत घोषणा केली की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहार मधून एका कार्यक्रमानिमित्त 1900 हप्ता जाहीर करण्यात येईल त्याचा थेट निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.
19 वा हप्ता कधी वितरित झाला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी म्हणजे आज पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे. जो कृषी क्षेत्रासाठी उत्पन्न सुधारण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून सुमारे ₹22,000 कोटी रुपये थेट 9.8 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत.
याच कार्यक्रमांतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला वार्षिक सहा हजार रुपयांच्या आर्थिक दिली जाते. जे दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांच्या तीन समान हफ्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केली जाते.
हे पण वाचा | शेतकऱ्यांनो, तुमच्या खात्यात आले का? ₹2000 रुपये इथे चेक करा
पीएम किसान सन्मान निधी योजनेची लाभार्थी यादी कशा पद्धतीने तपासायची
- प्रथम pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- त्यानंतर “Farmer’s Corner” या पर्यावर क्लिक करा
- त्यानंतर तिथे “Beneficiary List” पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करा.
- त्यानंतर तुमचा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकून पेमेंट इतिहास आणि पात्रता सत्यापित करा.
- नंतर तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले आहेत का हे तुम्हाला दिसण्यास सुरुवात होईल.
अशा पद्धतीने आपण माहिती जाणून घेतली की, तुम्ही तुमचे नाव यामध्ये चेक करू शकता. तसेच अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या अधिकृत वेबसाईटला भेट देत चला जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल आणि आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करून ठेवा जेणेकरून तिथे तुम्हाला लवकर अपडेट मिळेल. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या पर्यायांचा वापर करू शकता.