Pm Kisan Beneficiary Status: देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे लवकर त्यांच्या खात्यावरती आता Pm Kisan योजनेचा हप्ता जमा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाची लाट पसरलेली आहे. 19 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत. त्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे खूप गरजेचे आहे. तसेच तुमची लाभार्थी यादी देखील तपासा! यादीत नाव असेल तर तरच तुमचा खात्यावरती ₹2000 हजार रुपये जमा होणार आहेत. Pm Kisan Beneficiary Status
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पुढच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठी घोषणा केलेली आहे. लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी या योजनेचा पुढचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करतील. अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांना ही भेट दिली जाणार आहे. म्हणजे अवघे पाच दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये जमा होणार आहेत त्यामुळे शेती आणि इतर दैनंदिन गरजा पूर्ण करण्यास शेतकऱ्यांना मदत होणार आहे. हि मदत करोडो शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे.
हे पण वाचा | Pm किसन योजनेचा 19 वा हप्ता या शेतकऱ्यांनाच मिळणार; तुमचे नाव आहे का चेक करा
eKYC प्रक्रिया अनिवार्य eKYC process mandatory
शेतकरी मित्रांना जर तुम्ही केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली नाही तर तुम्हाला यापुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यासाठी eKYC प्रक्रिया पूर्ण करा ही प्रक्रिया तुम्ही तुमच्या जवळच्या CSC केंद्राला भेट देऊन किंवा तुम्ही स्वतः ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करू शकता. त्यासाठी तुम्हाला या योजनेच्या अगोदर वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
पी एम किसान योजनेचे रजिस्ट्रेशन करा (Apply like this in PM Kisan Yojana)
तुम्ही देखील या योजनेमध्ये अर्ज करू इच्छित असाल तर या योजनेचा अधिकृत वेबसाईटला भेट नवीन शेतकरी नोंदणी या पर्यायावर क्लिक करा. वैयक्तिक माहिती( नाव, आधार क्रमांक, राज्य, जिल्हा, तालुका, गाव इत्यादी) बँक खात्याचे तपशील जोडा आणि जमिनीच्या नोंदणी ( 7/12) अपलोड करा. नोंदणीकृत मोबाईल नंबर आलेला ओटीपी पडताळणी करा. सबमिट केल्यावर ती तुमचा अर्ज प्रक्रिया केली जाईल. यानंतर तुम्हाला या योजनेत वार्षिक ₹6000 रुपये आर्थिक मदत दिली जाईल.
मोबाईल नंबर अपडेट करा! (PM Kisan Yojana Mobile Number Update)
जर तुमचा मोबाईल नंबर बदलला असेल किंवा तुम्हाला तो अपडेट करायचा असेल, तर खालील दिलेल्या पायऱ्या वाचा.
सर्वात प्रथम pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या फार्मर कॉर्नर मध्ये जा मोबाईल अपडेट नंबर हा पर्याय आधार क्रमांक एंटर करा त्यानंतर ओटीपी पडताळणी अशा पद्धतीने तुमचा मोबाईल नंबर अपडेट करू शकता.
(पी एम किसान योजनेच्या अपडेट साठी दररोज आमच्या पेजला भेट देत रहा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा)
मी हडसुणी ता.जि.धुळे येथील शेतकरी असुन मागील 8महिन्यापासुन पीएम योजनेसाठी अर्जासह 7/12, बँक खात्याची सविस्तर माहिती दिलेली असुन आजवर 1रूपयाही जमा झालेला नाही, या भाजपा शासन लबाडावंर माझा विश्वास नाही हे थापा जास्त मारतात करत काहीही नाही.
सर जर काही प्रोब्लेम येत आहे तर तूम्ही कृषि कार्यालय येथे जाऊन चेक करू शकता. शासनाच्या माध्यमातून अशा शेतकऱ्यांसाठी एक नवीनमोहीम राबवण्यात येत आहे ज्यामुळे तिथे तुमचे समस्येचे निवारण होऊ शकते