PM Kisan 20th Installment: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे. या योजनेअंतर्गत 19 वा हप्ता फेब्रुवारीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. पुढच्या हप्त्यासाठी अपेक्षित चार महिन्याचा कालावधी पूर्ण झालेला असून अजून देखील 20 व्या हाताचे 2000 रुपये जमा झाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये थोडी चिंता दिसत आहे. पी एम किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकार पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये आर्थिक मदत देते. जे प्रत्येकी दोन हजार रुपयाच्या तीन समान हफ्त्यांमध्ये चार महिन्याच्या अंतराने शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये महाडीबीटी द्वारे जमा केले जाते.
आतापर्यंत या योजनेअंतर्गत एकूण 1970 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. 19 वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी बिहारमधील भागलापूर या ठिकाणावरून शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आला होता. यापूर्वी अठरावा हप्ता महाराष्ट्रातील वाशिम मधून, 17 हप्ता 18 जून 2024 रोजी वाराणसी येथून, तर 16 वा हप्ताह 29 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्रातील यवतमाळ मधून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला होता. या वेगवेगळ्या ठिकाणाहून हप्ते जारी करणे हे सरकारचा थेट लाभ जमा करण्याद्वारे विविध क्षेत्रांना जोडण्याचा प्रयत्न दर्शवतो. PM Kisan 20th Installment
हे पण वाचा| शिधापत्रिका धारकांसाठी महत्त्वाची बातमी ! या नागरिकांना सप्टेंबर महिन्यापासून रेशन मिळणार नाही, यादीत तुमचे नाव आहे का?
साधारणपणे प्रत्येक हप्ता चार महिन्याच्या अंतरावर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो. मात्र 19 वा हप्ता फेब्रुवारीमध्ये आल्यानंतर आता जुलै महिना सुरू झाला असला तरी विसाव्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. दरम्यान हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार याबाबत कोणतेही अधिकृत घोषणा करण्यात आलेले नाही. 18 जुलै 2025 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बिहार मधील मोती हिरा या ठिकाणी भेट देणार असल्याने अनेकांना या ठिकाणावरून शेतकऱ्यांना विसाव्या हाताचे पैसे वितरित केले जाणार असल्याची अपेक्षा होती. मात्र तसे न झाल्याने लाभार्थी थोडे निराश झाले आहेत.
मागील वेळापत्रक अनुसार विसावा होता ऑगस्ट 2025 मध्ये विशेषता खरीप हंगामात देण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी जूनच्या मध्यात प्रधानमंत्री यांनी वाराणसी येथून 17 वा हप्ता दिला होता. त्यामुळे आगामी संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान किंवा त्यानंतर वाराणसी सारख्या ठिकाणी पुन्हा एकदा पुढील हप्ता जारी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र अजून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
सध्या तरी कृषिमंत्र्यांनी 20 व्या हप्त्याची नेमकी तारीख आणि ठिकाण याबाबत कोणती अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत घोषणेची वाट पहावी आणि पीएम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टल वर जाऊन योजनेसाठी आवश्यक सर्व गोष्टींचे पालन करावे. तुमचे नाव पी एम किसान योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये आहे का नाही याची खात्री करून घ्यावी. त्याचबरोबर पी एम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टल वर जाऊन लाभार्थी स्थिती देखील पाहता येते.
1 thought on “PM Kisan 20th Installment: पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे ₹2000 शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार?”