PM Kisan 20th installment | राज्यामध्ये पावसाचे आणि सणासुदीचे दिवस सुरू आहेत अचानक कुठेही पाऊस पडत आहे त्याचबरोबर आता आपल्याकडे सणासुदीचे दिवस सुरू होणार आहेत याच पार्श्वभूमी वरती शेतकऱ्यांना पैशाची गरज भासते. यामुळे शेतकरी बांधव आता आपल्याला दर चार महिन्याला मिळणाऱ्या दोन हजार रुपये याची वाट पाहत आहेत. शेतीच्या मशागतीसाठी किंवा सणासुदीसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. प्रशासनाने लवकरात लवकर पैसे दिले तर खूपच मोठी मदत शेतकऱ्यांना होणार आहे. कधी होणार हप्ता जमा होणार याची माहिती आपण जाणून घेऊया. PM Kisan 20th installment
शेतकऱ्यांसाठी सरकारने सुरू केलेली ही योजना आता त्यांच्या जगण्याचा आधार ठरत आहे. घरामध्ये दवाखान्याचा खर्च, मुलांचे शिक्षण, बियाण्याची खरेदी, खत किंवा शेतमजुरांचे पैसे या सगळ्या गोष्टी या दोन हजार रुपये खूप महत्त्वाचे आहे. आणि आता हाच 20 वा हप्ता मिळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
जुलै महिन्यात शेतकऱ्यांना मिळणार हप्ता
18 जुलै 2025 रोजी या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार मधील मुतोहरी मध्ये एक मोठे जनसभेचे आयोजन करणार आहेत. या कार्यक्रमामध्ये अनेक योजनांचा घोषणा होणार आहेत असं सांगण्यात येत आहे. याचबरोबर PM KISAN योजनेतील हप्ता देखील जमा होणार असल्याची शक्यता वर्तनात येत आहे. म्हणजे जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपयांची मदत जमा होण्याची शक्यता सध्या प्रसार माध्यमांमध्ये वर्तवण्यात येत आहे.
मात्र फक्त वाट बघत बसून चालणार नाही. आपल्याला देखील हप्ता मिळवण्यासाठी काहीतरी करावा लागणार आहे. जसं की ज्या शेतकऱ्यांची KYC पूर्ण नाही, आधार कार्ड बँक खात्याची लिंक नाही, किंवा चुकीची IFSC नंबर आहे असे शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही. यामुळे लवकरात लवकर आपल्या जवळच्या CSC केंद्रात जाऊन सर्व गोष्टी अपडेट करायचे आहेत आणि मग खात्यात पैसे येतील.
आतापर्यंत केंद्र सरकारने देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांना १९ हप्ते वितरित केलेले आहेत यामध्ये जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 38,000 कोटी रुपये थेट ट्रान्सफर केले आहेत. आणि आता पुढच्या हप्त्याची वाट शेतकरी पाहत आहे तो जुलै महिन्यामध्ये येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अर्थातच सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर झाली नसली परंतु अनेक विश्वास प्रसार माध्यमांच्या माध्यमातून 18 जुलै ही तारीख म्हणून गृहीत धरली जात आहे.
शेती खरीप हंगाम सुरू आहे. भात, सोयाबीन, मका, कापूस, भुईमूग, ऊस या सर्व पिकांची पेरणी अंतिम टप्प्यात आहे. यासाठी शेतकऱ्यांना भांडवली ची गरज आहे. खते, बी बियाणे, मजुरी, ट्रॅक्टर डिझेलचा खर्च. या सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक शेतकरी बँकेकडे डोकं वाकवतात. आणि त्यातच ही ₹2000 ची मदत त्यांच्या सगळ्या चिंता काही अंशी हलक्या करते.
(Disclaimer: वरील माहिती प्रसार माध्यमांच्या आधारित आहे याबाबत आमच्याकडे कुठलाही पुरावा नाही)
हे पण वाचा | फार्मर आयडी धारक शेतकऱ्यांना ही सुविधा मिळणार मोफत! सरकारचा मोठा निर्णय…