PM Kisan 19th installment live : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेले आहे. उद्या नरेंद्र मोदी हे बिहार इथून दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर ते जमा करणार आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाची लाट पसरली आहे. होळी पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावरती १९वा हप्ता जमा होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठ्या आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. PM Kisan 19th installment live
पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार येथे एका शेतकरी मेळाव्या दरम्यान उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे औचित्य साधून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हप्ता जमा शेतकऱ्याला ही मदत डीबीटी अंतर्गत मिळणार आहे. 24 फेब्रुवारी 2025 रोजी भागलपुरा, बिहारीतून डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर पद्धतीने हा आता हस्तांतरित होणार आहे. विशेषता ही योजना गरीब शेतकऱ्यांसाठी एक फायदेशीर ठरली देशभरातील करोडो शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळतील.
PM Kisan 19th installment live शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा?
देशभरातील गरीब शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देण्यासाठी केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली, ही योजना शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणारे जगातील सर्वात मोठी योजना आहे. अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते. ही मदत शेतकऱ्यांना डीबीटी अंतर्गत थेट मिळते. यामुळे शेतकऱ्यांना बी आणि खते खरेदी करण्यास मदत होते. दर चार महिन्याच्या अंतराने शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये जमा केले जातात.
आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 18 हप्ते जमा झालेली आहे. या योजनेचा 18 वा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांना १९ व्या हप्त्याची आतुरता लागली होती. आता उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती 19 वा आता जमा करणार आहे यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
हे पण वाचा | PM किसान योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक; सायबर गुन्हेगारांकडून लाखो रुपयांचा घोटाळा
PM Kisan 19th installment live : या योजनेसाठी नोंदणी कशी करावी ?
योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागणार किंवा संबंधित राज्य कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन देखील नोंदणी करता येते. या योजनेत अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड मोबाईल क्रमांक बँक खाते क्रमांक, जमिनीचे कागदपत्रे तसेच या योजनेचा लाभ दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनाच लाभ मिळतो.