pipeline subsidy : राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नेहमीच नवीन नवीन योजना सुरू करत आहे. शेतकरी मित्रांना तुम्हाला माहित आहे का राज्य सरकार शेतकरी बांधवांसाठी एक मोठी योजना राबवत आहे, या योजनेचे माध्यमातून शेतकरी बांधवांना मोफत पाईपलाईन दिली जात आहे. शेतकऱ्यांना नेहमीच हवामानातील बदल आर्थिक आव्हाने आणि नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो त्यामुळे शेतकरी आपले पिकाचे योग्य ते देखभाल करू शकत नाही. या कारणामुळे राज्य सरकार नेहमी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू करीत आहे. pipeline subsidy
अशीच एक महत्वपूर्ण योजना सरकारने शेतकरी ना साठी राबवली आहे. शेतकऱ्यांना सिंचन करण्यासाठी सरकार आता शेतकऱ्यांना मोफत पाईपलाईन साठी अनुदान देणार आहे. तुम्हाला या योजनेबद्दल माहिती आहे का? या योजनेचा अर्ज कसा करायचा? या योजनेचा लाभ कोणते शेतकरी घेऊ शकतात? हे सर्व आज आपण पाहणार आहोत.
हे पण वाचा :- SBI च्या या स्पेशल योजनेत गुंतवणूक करा आणि मिळवा 5 लाख 61 हजार रुपये, जाणून घ्या सविस्तर माहिती
पाईपलाईन योजना म्हणजे काय ?
पाईपलाईन योजना ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने राबवलेली एक महत्वपूर्ण योजना आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी या योजनेचा फायदा होणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभी यांना अंतर्गत महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी सिंचनासाठी पाईपलाईन खरेदीवर 50 टक्के अनुदान मिळणार आहे.
पाईपलाईन योजनेचे महत्त्वपूर्ण मुद्दे :-
शेतीसाठी सिंचन व्यवस्था व पाणी व्यवस्था सुधारण्यासाठी ही योजना शेतकऱ्यांना मदत करत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना या पाइपवर मिळणारा.HDPE पाईप प्रति मीटर 50 रुपये अनुदान.pvc पाईपवर प्रति मीटर 35 रुपया अनुदान मिळणार आहे.
हे पण वाचा :- SBI च्या या स्पेशल योजनेत गुंतवणूक करा आणि मिळवा 5 लाख 61 हजार रुपये, जाणून घ्या सविस्तर माहिती
पाईपलाईन योजनेला अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-
- लाभार्थी शेतकऱ्याच्या नावावर जमिनीचा पुरावा सातबारा उतारा
- लाभार्थी शेतकऱ्याची आधार कार्ड
- बँक पासबुक
- रहिवासी दाखला
- पाणीपुरवठ्याचा पुरावा
पाईपलाईन योजनेचे फायदे :-
- पाईपलाईन योजनेमुळे शेतकऱ्यांच्या पाण्याची बचत होणार आहे.
- पाण्याची उपलब्धता वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये देखील वाढ होणार आहे.
- शेतकऱ्यांना पाईपलाईन योजनेमुळे शेतीला पाणी देणे सोपे व सुलभ जाणार आहे.
योजनेला अर्ज करण्यासाठी पात्रता :-
अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्रातील रहिवासी असला पाहिजे.
अर्जदाराच्या नावावर शेत जमीन असली पाहिजे.
शासनाने निर्धारित केलेल्या इतर पात्रता आणि कशाची पूर्तता मध्ये बसणारा असावा.
पाईपलाईन योजनेला असा करा ऑनलाईन अर्ज :-
जर तुम्ही या योजनेला पात्र असा अर्ज कसा करायचा असा प्रश्न पडला असेल तर खाली दिलेल्या सोपी पद्धत वापरून तुम्ही पाईपलाईन योजनेला अर्ज करू शकता.
सर्वप्रथम तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे लागेल.
पाईपलाईन योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
महाडीबीटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर तुमच्यासमोर शेतकरी नोंदणी असा पर्याय दिसेल येथे क्लिक करा.
त्यानंतर आवश्यक माहिती भरून नोंदणी पूर्ण करा व समिट बटनावर क्लिक करा.
लॉगिन झाल्यानंतर तुमच्यासमोर योजना विभाग दिसेल या विभागामध्ये जाऊन पाईपलाईन योजना निवडायची आहे.
यानंतर तेथे दिलेली आवश्यक माहिती भरा व आवश्यक कागदपत्रे त्या ठिकाणी अपलोड करा.
पाईपलाईन योजनेची माहिती :-
पाईपलाईन योजना ही महाराष्ट्रातील सरकार द्वारा राबवली जाणारी एक योजना आहे. या योजनेचे माध्यमातून कृषी विभाग व महाराष्ट्र इतक्यांना आपल्या शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी मोफत पाईपलाईन योजना राबवळीत आहे. या योजनेअंतर्गत अर्थ केलेल्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने आवाहन केले आहे. आधुनिक सिंचन पद्धतीचा अवलंबून करून शेती उत्पादनांमध्ये वाढ होऊ शकते व ही योजना शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे.
Thanks