Pik Vima : या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचे पैसे वितरित! तुमच्या खात्यामध्ये आले का पहा सविस्तर माहिती

Pik Vima : सोलापूर जिल्ह्याचे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. गेला खरीप हंगामामध्ये सलग पडलेल्या पावसामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवलेल्या संकटामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम निश्चित झालेली आहे. आता ही रक्कम पुढील आठवड्यात थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे. एक मोठा आधार मिळणार आहे.

सलग पावसाने पिकांचे मोठे नुकसान

गेल्यावर्षी चार जून पासून जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू झाला होता. विभागामध्ये सारख्या पावसाने पंधरा दिवसापेक्षा अधिक काळ चालला. या मुसळधार पावसामुळे उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. बाजरी, मुग, उडीद, तूर, मका, भुईमूग, कांदा, सोयाबीन अशी अनेक पिके शेतीच्या बांधावर उभी असताना पाण्याखाली गेली आहे.

इतकंच नाही तर अनेक शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या धान्य, कांदे, डाळी अंगणात वाड्यावर किंवा बांधावर साठवलेले असताना त्यांनाही पावसाचा फटका बसलेला आहे. त्यामुळे उभय पिकासोबत काढणी झालेल्या पिकांचाही मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेला आहे.

2.11 लाख शेतकऱ्यांना मिळणार भरपाई

या संपूर्ण नुकसान भरपाई बाबत शेतकऱ्यांनी वेळेवर इंतीमेशन (तक्रारी) दाखल केल्या होत्या. त्या तक्रारी वर आधारित पंचनामे जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली पिक विमा कंपनीकडून करण्यात आले. त्यानंतर नुकसानीच मूल्या मापन होऊन सोलापूर जिल्ह्यातील एकूण 2,11,663 शेतकऱ्यांना 282 कोटी 19 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

रकमेत स्थानिक नैसर्गिक आपत्ती Standing crop loss) आणि पीक काढल्यानंतर झालेले नुकसान (Post harvest loss) यांचा समावेश आहे.

रक्कम खात्यावर कधी जमा होईल ?

सध्याही नुकसान भरपाई रक्कम अंतिम टप्प्यात असून, पुढील आठवड्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार असल्याची माहिती कृषी विभागांनी दिली आहे. मात्र मागील अनुभव लक्षात घेता, शेतकऱ्यांमध्ये अजूनही शंका आहे आणि अनिश्चितेचे वातावरण आहे. काही वेळेस अनेकदा रक्कम जमा होईल असे सांगण्यात येत पण ती प्रत्यक्षात कधी जमा होते हे सांगता येत नाही.

विमा कंपनीच्या सोयीप्रमाणे भरपाई

शेतकऱ्यांनी वेळेवर विमा हप्ते भरले असले तरी कंपन्याकडून नुकसान भरपाई देताना उशीर केला जातो. शासनाकडून विमा कंपन्यांना किती रक्कम दिली जाते आणि त्या माध्यमातून नेमकी किती रक्कम शेतकऱ्यांना दिली जाते, याचा हिशोब पारदर्शक नसतो. त्यामुळे अनेकदा शेतकऱ्यांचा नुकसान भरपाई देण्याचा प्रक्रियेत होतं.

तालुकानिहाय रकमेचे वाटप

जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांना सर्वाधिक नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यानंतर अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ, करमाळा, माढा आणि मंगळवेढा या तालुक्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर रक्कम वाटप करण्यात येणार आहे.

दुसरीकडे, पंढरपूर, सांगोला आणि माळशिरस या तालुक्यांना फारच कमी रक्कम मिळणार आहे. हे पाहता, काही भागांमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई समाधानकारक असली तर दिसत असला तरी काही भागात शेतकरी अजूनही नाराज आहेत.

पंचनामे पूर्ण, आता रक्कम वाटपाचं वाट

कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरपंच नव्या पूर्ण झाले असून विमा कंपनीकडून अंतिम मंजुरी मिळाली आहे. यासंदर्भात विमा कंपनीशी वारंवार संपर्क साधून रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार असे आश्वासन दिले आहे.

शेतकऱ्यांचे म्हणणं, रक्कम खात्यात पडेपर्यंत काही खात्री नाही

अनेक शेतकरी म्हणतात की, दरवेळी सांगितलं जातं की पुढच्या आठवड्यात पैसे मिळतील, पण ते पुढचे आठवडे केव्हा संपतात याला काही वेळा पत्रक नाही. त्याच्यावरती पैसे जमा होईपर्यंत कोणीच विश्वास ठेवायला तयार नसतो.

शेतकरी संघटनांनी देखील शासनाकडे मागणी केली आहे की विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना वेळेत भरपाई द्यावी आणि याची स्वतः शासनाकडून देखरेख असावी.

शेतकरी पुन्हा खरीपि साठी सज्ज, पण हिशोब शिल्लक

एप्रिल आखरीस उन्हाळाच तापमान वाढत आहे आणि पावसाळा आता दोन अडीच महिन्यावरती आले. शेतकऱ्यांना बियाणं, खते, कीटकनाशके, मशागत यासाठी तयारी सुरू केलेली आहे. पण गेल्या हंगामात झालेलं नुकसान अजूनही भरून निघाला नाही. त्यामुळे नवीन हंगामाची सुरुवात करताना त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो.

जर नुकसान भरपाई वेळेत मिळाली, तर ती या खरीप हंगामासाठी उपयोगी ठरू शकते. पण जर ही भरपाई उशिरा आली, तर शेतकऱ्यांनाच नियोजन कोलमडू शकता.

शेवटी – पारदर्शक यंत्रणा हवीच

पिक विमा ही योजना शेतकऱ्यांना मोठा आधार ठरू शकते, पण युवा कंपन्यांना आणि शासकीय यंत्रणांमध्ये परदक्षता नसल्यामुळे शेतकरी भरपाईपासून वंचित राहतात. यावर कायमस्वरूपी उपाय शोधणे गरजेचे असतं. नुकसान भरपाईची निश्चित वेळ आणि टप्पे जाहीर करावे विमा कंपनीकडून वेळोवेळी माहिती अपडेट व्हावी, शेतकऱ्यांना मोबाईलवर एसएमएस द्वारे स्थितीची माहिती द्यावी, नुकसानीचे निकष स्पष्ट करावेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना वेळेत भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी होत आहे.

(Disclaimer : ही माहिती विविध सरकारी अहवाल व वृत्तसंस्थेततळावरून संकलित केली आहे हिचा अचूकतेची खातिर जमा संबंधित अधिकृत यंत्रणे कडूनच मिळू शकते. वाचकांनी केवळ माहिती म्हणून पहावं)

हे पण वाचा | Agricultural Law : शेतात जायला रस्ता नाहीये? शेजारचा शेतकरी रस्ता देत नाही? तर चिंता नको! असा मिळवा हक्काचा रस्ता

Leave a Comment

error: Content is protected !!