Petrol Pump Scheme : तरुणांसाठी एक नवीन संधी निर्माण झालेली आहे. तुम्ही देखील एखादा मोठा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. राज्य सरकारांतर्गत तरुणांसाठी एक नवीन संधी उपलब्ध झालेली आहे. राज्य सरकारने पेट्रोल पंप व्यवसाय सुरू करणाऱ्या उद्योजकांसाठी मोठीं उपलब्ध करून दिलेली आहे. राज्य सरकारने पेट्रोल पंप उभारण्यासाठी आवश्यक असलेले विविध परवानगीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी निर्णय घेतलेला आहे. याबाबत बोलत असताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाची माहिती दिली, येत्या काळामध्ये राज्यात 2000 नवीन पेट्रोल पंप सुरू करण्याची नियोजन करण्यात आलेले आहे. Petrol Pump Scheme
राज्य सरकारने राज्यात 1660 पेट्रोल पंप परवानग्यासाठी एक खिडकी योजना लागू करण्यात आलेली आहे. प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ही सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पेट्रोल पंप उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या महसूल विभाग, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इंधन कंपन्यांच्या विविध परवानगीसह मिळू शकतील.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी महसूल विभागाला ही योजना त्वरित लागू करण्याचे निर्देश दिलेले आहेत. महसूल मंत्री बावनकुळे यांनी याबाबत माहिती दिली आहे. या निर्णयामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मित होणार आहे. अंदाजे या पंपामुळे सुमारे 30 हजार नव्या रोजगारांच्या संधी उपलब्ध होतील.
तीन महिन्यात मंजुरी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश
पेट्रोल पंप परवानगी प्रक्रियेला वेग देण्यासाठी आवश्यक असलेली अटी व शर्ती कमीत कमी ठेवण्याची आणि आदर्श कार्यपद्धती विकसित करण्याच्या सूचना महसूल विभागाला देण्यात आलेल्या आहेत. तसेच विभागीय आयुक्तांनी तातडीने आवश्यक कारवाई करावी, राजेश देखील महसूल मंत्र्यांनी दिलेले आहेत.
हे पण वाचा | बिझनेस आयडिया असावी तर अशी! दिवसाला फक्त चार-पाच घंटे काम करा आणि कमवा लाखो रुपये?
30 हजार रोजगार आणि चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक
केंद्र सरकारने 1660 पेट्रोल पंप मंजूर केलेले असून, हे पंप कार्यनवित झाल्यानंतर राज्यात साडेतीन ते चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे नवीन उद्योजक आणि तरुणांना व्यवसाय करण्याची उत्तम संधी मिळणार आहे.
इंधन कंपन्यांच्या समस्या सोडवण्यासाठी उच्चस्तरीय बैठक
यासंदर्भामध्ये झालेल्या बैठकीत महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, सहसचिव अजित देशमुख, BPCL चे सुंदर राघवन, एचपीसीलचे B. अचित कुमार, व मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ. आनंद बंग आणि इतर अधिकारी उपस्थित होते. पेट्रोल पंप व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेल्या उद्योजकांनी ही संधीचं सोनं करावं. या योजनेअंतर्गत परवानगी प्रक्रिया जलद आणि सुलभ होणार आहे यामुळे इच्छुकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
I am intrested to start petrol pump
अर्ज करा