Petrol diesel Commission : सध्या देशामध्ये पेट्रोल डिझेलचे दर इतके वाढले आहेत की, सामान्य माणसाला गाडी चालवावी की नाही असा प्रश्न पडतोय. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? आपण जे पेट्रोल आज टाकतो त्यातून पेट्रोल पंप मालकाला नेमकं किती पैसे मिळतात? अनेकांना वाटतं की, लिटरला शंभर रुपये पेक्षा जास्त मिळत असताना पंप मालक जबरदस्त नफा कमवत असतील. पण वास्तव काहीसा वेगळे आहे. Petrol diesel Commission
पेट्रोल डिझेल दर वाढलेत, पण पंप मालकाचे कमिशन किती?
दिल्ली सारख्या मोठ्या शहरांमध्ये सध्या पेट्रोलची किंमत सुमारे ₹94.77 प्रति लिटर आहे. पण यामध्ये डीलरला म्हणजेच पंप मालकाला मिळणाऱ्या रकमेचा वाटा फक्त ₹4.40 इतकाच असतो. तर डिझेलच्या बाबतीत हे ₹3.03 प्रति लिटर इतकं असतं. म्हणजेच ज्या 90-100 रुपये मध्ये आपण एक लिटर पेट्रोल घेतो, त्यामध्ये पंप मालकाला मिळणाऱ्या नफा खूपच मर्यादित असतो.
पेट्रोलच्या दरात काय समाविष्ट असतं?
तुमच्या पेट्रोलमध्ये खालील बाबींचा समावेश असतोः
- बेस प्राइस (Base Price) – म्हणजे कंपन्यांकडून खरेदी केलेला मूळ दर
- फ्रेट चार्ज (Transportation) – म्हणजे डिपोमधून पंपापर्यंत आणण्याचा खर्च
- एक्साइज ड्युटी (Excise Duty) – केंद्र सरकारकडून घेतला जाणारा कर
- व्हॅट / विक्रीकर (VAT / Sales Tax) – राज्य सरकारचा कर
- डीलरचा कमिशन – फक्त ₹4.40 (पेट्रोल) आणि ₹3.03 (डिझेल)
मग पंप मालकाला पैसे कसे मिळतात
- फक्त पेट्रोल विकून फारसा नफा होत नाही. म्हणूनच पंप मालक पुढील गोष्टींमधून कमाई करतात.
- नायट्रोजन हवा भरून देणे (Air/Nitrogen services)
- कार सर्व्हिसिंग/वॉशिंग सेंटर्स
- इतर उत्पादनांची विक्री – इंजिन ऑईल, कूलंट इत्यादी
- ATM, फास्टटॅग, मिनरल वॉटर, खाद्यपदार्थ विक्री
- खासगी कंपन्यांशी करार – बिझनेस-टू-बिझनेस डील्स
पेट्रोल पंप म्हणजे सोन्याची खान नसते !
आणि त्यांना वाटतं की पंप मालक प्रचंड श्रीमंत असतात. खरं तर त्यांच्या मागे वीज बिल, कर्मचारी पगार, देखभाल खर्च, सुरक्षा, सर्विस टॅक्स, कर्जाचे हप्ते अशा अनेक जबाबदार असतात. त्यातही जर विक्री कमी झाली, तर नुकसान भोगावे लागतात.
एक लिटर पेट्रोलवर डीलरला मिळतं ₹4.40 कमिशन. एक लिटर डिझेल ला डीलरला मिळते ₹3.03 कमिशन पेट्रोलच्या किमतीमध्ये टॅक्सचा मोठा वाटा असतो. नफा वाढवण्यासाठी पंप मालक अतिरिक्त सेवा देतात. अशा पद्धतीने आपण पहिले की पंप मालकाला किती रुपये एक लिटर मागे राहतात.
हे पण वाचा | पेट्रोल पंप सुरू करायचा आहे? जाणून घ्या प्रति लिटर किती रुपये मिळतात
1 thought on “एक लिटर पेट्रोलवर पंप मालकाला किती पैसे मिळतात? जाणून घ्या संपूर्ण हिशोब”