Panjabrao Dakh Rain Alert: सध्या संपूर्ण राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसत असल्याचे आपण पाहत आहोत. मात्र अजूनही काही भागांमध्ये जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम असल्याचे देखील दिसून आले आहे. कोकण परिसरामध्ये गेल्या काही दिवसापासून पावसाने मोठा धुमाकूळ घातला असून पुढील चार दिवस कोकणात आणखीन जोरदार पाऊस होण्याचा अंदाज कायम आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचा घाटमाथा तसेच खानदेश मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आणि पूर्व विदर्भामध्ये पुढील चार दिवस जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
महाराष्ट्रातील इतर भागाच्या तुलनेत मराठवाडा आणि विदर्भात पावसाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी चांगल्या पावसाची प्रतीक्षा असून त्यांच्या पिकासाठी चांगला पाऊस कधी पडेल असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी त्यांचा नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे. हा हवामान अंदाज खास विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे.
पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज
पंजाबराव डख यांनी सांगितल्याप्रमाणे, सहा ते आठ जुलै दरम्यान संपूर्ण राज्यांमध्ये जोरदार पाऊस होणार आहे. परंतु हा पाऊस विखुरलेल्या स्वरूपात राहील यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा पाऊस भाग बदलत पडणार आहे. सहा ते आठ जुलै दरम्यान पूर्व आणि पश्चिम विदर्भ मिळून 11 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. Panjabrao Dakh Rain Alert
हे पण वाचा | राज्यात पुन्हा तुफान पाऊस होणार! 11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; नागरिकांनी सावधान रहावे..
विदर्भामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे त्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस लाभाचा ठरू शकतो. असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. परंतु हा पाऊस सर्व सर्वत्र पडेल असे नव्हे, पंजाबराव यांनी सांगितल्याप्रमाणे नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, बुलढाणा, अकोला तसेच मराठवाडा मधील जालना, जळगाव जामोद तसेच खानदेश पट्ट्यातील धुळे नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये सहा ते नऊ तारखे दरम्यान चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडेल असे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान या कालावधीमध्ये पूर्ण विदर्भातील सात जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस हजेरी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मराठवाड्याच्या दृष्टिकोनातून हवामान अंदाज वर्तवताना त्यांनी सांगितले की, नांदेड परभणी जालना लातूर बीड आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा ठिकाण बदलून पाऊस होण्याची शक्यता आहे. परंतु नांदेड जिल्ह्यात या तीन दिवसात चांगला पाऊस पडेल असे त्यांनी यावेळी सांगितले आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात 70 टक्के भागांमध्ये चांगला पाऊस होणार आहे. म्हणजेच एकंदरीत आपल्याला दिसून येते की पूर्व आणि पश्चिम विदर्भामध्ये पुढील चार दिवसात चांगला पाऊस राहण्याची शक्यता आहे. परंतु नाशिक आणि कोकण किनारपट्टीच्या भागांमध्ये जो काही जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू आहे तो पाऊस तसाच कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
अहिल्या नगर जिल्ह्यातील संगमेश्वर या भागाच्या पलीकडे देखील रिमझिम स्वरूपाचा पाऊस सुरू राहील असे त्यांनी म्हटले आहे. वर्धा नागपूर तसेच गडचिरोली भंडारा अमरावती वाशिम इत्यादी जिल्ह्यामध्ये पुढील चार-पाच दिवस जोरदार पाऊस असणार आहे. त्यानंतर मात्र 13 जुलै ते 27 जुलै या कालावधीत वातावरणात मोठा बदल होऊन जुलै च्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा चांगला पाऊस महाराष्ट्रात होईल असा हवामान अंदाज त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी वर्तवला आहे. परंतु दहा जुलै पर्यंत राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस राहील असे त्यांनी खासकरून नमूद केले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाजाची दखल घेणे गरजेचे आहे.
1 thought on “महाराष्ट्रातील या भागात होणार जोरदार पाऊस! पंजाबराव डख यांनी सांगितला नवीन हवामान अंदाज..”