Panjabrao Dakh Havaman Andaj: राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. राज्यात लवकरच पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होत आहे. प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात राज्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. सध्या पावसाने अनेक भागांमध्ये विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पाऊस नसल्यामुळे हाता तोंडाशी आलेली पीक जळून चालली आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पंजाबराव डख यांच्या अंदाजातून आशेची किरण मिळाली आहे.
पंजाबराव डख यांनी 8 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट या कालावधीत राज्यात मुसळधार पाऊस पडेल असे सांगितले आहे. या कालावधीमध्ये राज्यात पुरुजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते असे देखील त्यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांनी पुढील दोन-तीन दिवसांमध्ये शेतीची कामे पूर्ण करून घ्यावीत त्यानंतर पाऊस शेतीची कामे करण्यासाठी वेळ देणार नाही असे त्यांनी सांगितले आहे. डख यांच्या अंदाजानुसार, आठ ते 11 ऑगस्ट दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये दररोज मुसळधार पाऊस पडेल. त्यानंतर दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर 14 ते 18 ऑगस्ट या काळात पावसाचा जोर पुन्हा वाढेल. विशेष म्हणजे ज्या भागात आत्तापर्यंत कमी पाऊस पडला आहे तिथे देखील चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा| तुरीची आवक वाढली! जाणून घ्या राज्यातील बाजार समितीमध्ये किती मिळतोय दर?
कुठे पडणार पाऊस?
या पावसाचा सर्वाधिक फायदा दक्षिण महाराष्ट्रातील नागरिकांना होण्याची शक्यता आहे. लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, सोलापूर, धाराशिव, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होणार आहे. यानंतर हा पाऊस जामखेड कर्जत दौंड बारामती या तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यातील राहता बीड कोपरगाव आणि नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात चांगलाच बरसणार आहे. जसजसा पाऊस उत्तरेकडे सरकेल त्याची तीव्रता कमी होईल असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.
याव्यतिरिक्त यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, बीड, धाराशिव, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजी नगर, अकोला अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खानदेश पट्ट्यात म्हणजेच धुळे नंदुरबार आणि जळगाव या भागात देखील आठ ते 11 ऑगस्ट दरम्यान चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Panjabrao Dakh Havaman Andaj
14 ते 18 ऑगस्ट दरम्यान चांगला पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र काही ठिकाणी पूर जन्य परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते असा इशारा डख साहेबांनी दिला आहे. मात्र पावसाच्या या आगमनामुळे खरीप हंगामातील पिकांना भूरूप येईल त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल. पाण्यापायी जळून चाललेली पिके भरून येतील अशी उम्मीद शेतकऱ्यांना लागली आहे.
2 thoughts on “महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवसापासून राज्यात होणार जोरदार पाऊस; बघा काय म्हटले पंजाबराव?”