Panjabrao Dakh Havaman Andaj: सध्या जर आपण महाराष्ट्रातील पावसाचे वातावरण बघितले तर मराठवाडा आणि विदर्भामध्ये जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळाली असून त्यासोबतच राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढल्याचे दिसत आहे. यामध्ये खास करून कोकण खानदेश तसेच घाटमाथा व मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम असून राज्यातील अनेक भागातील नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. यामध्ये राज्यातील जे काही महत्त्वाची धरणे आहेत त्यांची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे. यामुळे सर्वसामान्य मोठा दिलासा मिळाला आहे. कोकणाचा हवामान अंदाज लक्षात घेतला तर या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसत असल्याचे चित्र दिसत आहे. यामध्ये प्रामुख्याने ठाणे तसेच रायगड जिल्ह्यांच्या चार मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे.
मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा तसेच कोल्हापूर व नाशिक या भागात पावसाचा जोर कमी जास्त होत असून धरणातील आवक देखील त्या दृष्टीने कमी जास्त होताना दिसत आहे. म्हणजेच एकंदरीत पाहता जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील बऱ्याच भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे राज्यातील बहुतांश भागांमध्ये शेतीच्या कामांना मोठा वेग आला आहे. परंतु आता यापुढे पावसाचे प्रमाण कशा पद्धतीने राहील हा देखील मोठा प्रश्न असून या दृष्टिकोनातून प्रसिद्ध हवामान अभ्यासात पंजाबराव डख यांनी नुकताच त्यांचा एक हवामान अंदाज वर्तवला असून तो शेतकऱ्यांसाठी खूप मोलाचे मार्गदर्शन करू शकतो.
राज्यात जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जरी चांगला पाऊस झाला असला तरी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने मोठी विश्रांती घेतल्याचे दिसत आहे. विशेषता मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांना पावसाची वाट पहावी लागत आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे. शेतकरी पिकाची लागवड झाल्यानंतर पावसाचे आतुरतेने वाट पाहत असतात मात्र या काळातच या भागातील शेतकऱ्यांना पावसाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत आहे. Panjabrao Dakh Havaman Andaj
हे पण वाचा | पिक विमा भरण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक! कसा काढायचा फार्मर आयडी? जाणून घ्या सविस्तर
पंजाबराव डख यांचा ताजा हवामान अंदाज
प्रसिद्ध हवामान अभ्यासात आणि शेतकऱ्यांच्या विश्वासांचे नाव असलेले पंजाबराव डख यांनी महत्त्वाचा हवामान अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार जर आपण बघितलं तर राज्यामध्ये सध्याची परिस्थिती बघता राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस होण्याची शक्यता नाही. परंतु विखुरलेल्या स्वरूपामध्ये हा पाऊस पडणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्याची परिस्थिती पाहता आज पूर्व विदर्भातील काही जिल्हे जसे की अमरावती बुलढाणा वाशिम या ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
त्याचबरोबर आज पावसाचे प्रमाण हे खूपच नगण्य असणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तसेच त्यांनी पुढे म्हटले आहे की राज्यामध्ये जुलै महिन्याच्या सुरुवातीला सोलापूर लातूर धाराशिव बीड या भागात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. परंतु तो देखील बऱ्याच ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात असेल. परंतु सध्या राज्यातील कोकणपट्टी आणि नाशिक या भागामध्ये जोरदार पाऊस सुरू असून तो अशाच पद्धतीने सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे राज्यात चांगला पाऊस केव्हा पडेल हा प्रश्न जर तुमच्या मनात उपस्थित होत असेल. तर त्याचे उत्तर पंजाबराव डख यांनी दिले आहे. डख साहेब म्हणाले, जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात चांगला पाऊस बसेल असे भाकित त्यांनी वर्तवले आहे. परंतु सध्या तरी राज्यामध्ये पावसाच्या वातावरण हवे तसे चांगले नसून पाऊस पडेल परंतु तो भाग बदलत आणि विखुरलेल्या स्वरूपात पडेल असे त्यांनी सांगितले आहे. म्हणजेच राज्याच्या परिस्थितीत जो काही पाऊस पडेल तो शेती पिकासाठी जीवनदान ठरणार आहे. शेतीसाठी नक्कीच या पावसाचा मोठा उपयोग होणार आहे. एकंदरीत पाहता राज्यामध्ये सध्यातरी जोरदार पावसाची शक्यता खूपच कमी आहे तुरळ ठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार असल्याचे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे.
2 thoughts on “महाराष्ट्रात आता मुसळधार पाऊस कधी होणार? पंजाबराव डख यांनी सांगितली तारीख… वाचा सविस्तर”