महाराष्ट्रात या तारखेपासून पावसाचा जोर वाढणार; पंजाबराव डख यांचा अंदाज आणि हवामान विभागाचा इशारा


Panjabrao Dakh Havaman Andaj: सध्या महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसत आहे. कोकणातील काही भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरी पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पाऊस थांबल्याचे चित्र दिसत आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढत चालला आहे. या पावसामुळे राज्याच्या अनेक भागात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढील काही दिवस संपूर्ण राज्यासाठी जास्त महत्त्वाचे आणि सावधानगिरी बाळगण्याचे असतील. राज्यात पुढील काही दिवसांमध्ये जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी सुरक्षित रहावे असा इशारा देण्यात आला आहे.

हे पण वाचा| लाडक्या बहिणींना 3,000 रुपये एकाचवेळी मिळणार? महिलांच्या खात्यात जमा होणार डबल हप्ता?

भारतीय हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक केंद्राने दिलेल्या माहितीनुसार पुणे कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर 26 जून ते 29 जून या कालावधीत मुसळधार आणि अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या भागातील नागरिकांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. याशिवाय रायगड जिल्ह्यासाठी 27 ते 29 जून दरम्यान येलो अलर्ट देण्यात आले आहे. त्याचबरोबर 30 जून रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडाटासह मध्यम पावसाचा अंदाज आहे.

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील चार ते पाच दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याने पुढील चार दिवस राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे ठरणार असून जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. Panjabrao Dakh Havaman Andaj

हे पण वाचा| वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्रात प्रथमच पुढील पाच वर्षासाठी वीजदर कमी होणार

पंजाब डख यांचा हवामान अंदाज

राज्याचे प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आपला ताजा हवामान अंदाज वर्तवला आहे. जो विशेष मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणार आहे. पंजाबराव डख यांनी म्हटल्याप्रमाणे सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या पाऊस साधारणपणे 1 जुलै पर्यंत असाच सुरू राहणार आहे. या काळात मराठवाडा आणि विदर्भ मध्ये पावसाची खास हजेरी पाहायला मिळणार आहे. त्यांनी विदर्भातील 11 जिल्हे आणि त्यासोबत जळगाव, छत्रपती संभाजी नगर, बुलढाणा, जालना, बीड, परभणी, लातूर, धाराशिव, नांदेड, यवतमाळ, हिंगोली, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागांना जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

हे पण वाचा| बियाणांपासून ते ट्रॅक्टरपर्यंत! शेतकऱ्यांना पंचायत समितीकडून मिळणार विविध योजनांचा लाभ, असा करा अर्ज..

पंजाबराव डख म्हणाले की, मराठवाडा आणि विदर्भामध्ये पुढील पाच ते सहा दिवस म्हणजेच साधारणपणे एक जुलै पर्यंत जोरदार पाऊस होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे एक जुलै नंतर विदर्भामध्ये पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मराठवाड्याच्या बाबतीत आज म्हणजेच 27 जून दरम्यान चांगला पाऊस होईल आणि तो शेतीसाठी नक्कीच फायद्याचा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पंजाबराव डख यांचा या हवामानामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

एकंदरीत पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाजानुसार आणि हवामान विभागाच्या हवामान अंदाजानुसार राज्यात आज पासून एक जुलै दरम्यान पाऊस होण्याची शक्यता आहे. हा पाऊस शेतीसाठी नक्कीच मोठ्या फायद्याचा ठरणार आहे. यावर स्पष्ट होते की मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी ज्या पावसाच्या आतुरतेने वाट पाहत आहेत ती प्रतीक्षा आता संपणार आहे. आज पासून एक जुलै पर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचे आगमन होणार असल्याने, पंजाबराव डख यांचा हा हवामान अंदाज या भागातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा ठरत आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “महाराष्ट्रात या तारखेपासून पावसाचा जोर वाढणार; पंजाबराव डख यांचा अंदाज आणि हवामान विभागाचा इशारा”

Leave a Comment

error: Content is protected !!