नविन Ola S1 pro Gen 3 इलेक्ट्रिकल स्कूटर लॉन्च जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत

Ola S1 pro Gen 3 : Ola Electric ने आपल्या इलेक्ट्रिकल टू व्हीलर श्रेणी मध्ये नवीन स्कूटर सादर केली आहे. S1 PRO GEN 3 लॉन्च केल्यानंतर याचे काही खास वैशिष्ट्ये व किंमत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. Ola S1 pro Gen 3

या S1 स्कूटर मध्ये नवीन अभियांत्रिक प्रणाली आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे. कंपनीने जुन्या जनरेशन मधील समस्या दूर करून या नवीन मॉडेलमध्ये अनेक सुधारणा केलेले आहेत. यामुळे ग्राहकांसाठी ही स्कुटी एक फायदेशीर ठरणार आहे या स्कुटीचे नवीन वैशिष्ट्य काय आहेत खालील प्रमाणे वाचा

Ola S1 pro Gen 3 स्कूटरची खास वैशिष्ट्ये

  • या स्कूटरमध्ये मॅग्नेटिक नसलेली मोटर बसवण्यात आलेली आहे. ती अधिक टॉर्क निर्माण करणार आहे. तसेच, या स्कूटर मध्ये बॅटरी कार्यक्षमता 4680 सेल्स टेक्नॉलॉजी वापरण्यात आलेली आहे, ज्यामुळे बॅटरीचे ऊर्जा साठवण्याची क्षमता दहा टक्क्यांनी वाढली आहे. या स्कूटरमध्ये वायरिंग आणि सेन्सर कमी करण्यात आलेले आहेत. ज्यामुळे मेंटेनन्स चा खर्च कमी होणार आहे. यश स्कूटरची फ्रेम आता ॲल्युमिनियमची असून, त्यामुळे तिचे वजन पूर्वीच्या मॉडेल पेक्षा कमी असणार आहे. Move os 5 हा नवीन ऑपरेटिंग सिस्टम स्कूटरच्या परफॉर्मन्सला अधिक प्रभावी बनवतो.

Ola Roadster Motorcycle आणि डिलिव्हरी साठी अपडेट

Ola ने 2024 मध्ये तीन नवीन मोटरसायकली भारतामध्ये सादर करण्याची घोषणा केलेली होती. यातील सर्वाधिक चर्चेत असलेली Ola Roadster मोटर सायकल अजूनही लॉन्च झालेली नाही. कंपनीने जानेवारी 2024 मध्ये याच डिलिव्हरी बाबत माहिती दिलेली होती, परंतु प्रत्यक्षात अद्याप कोणतीही निश्चित तारीख करण्यात आलेली नाही. तसेच कंपनीच्या वेबसाईट आणि फ्रेंचाईजी ऑफिसवर मोठ्या प्रमाणात चौकशी होत आहे. ग्राहकांना लवकर डिलिव्हरी सुरू होईल असे आश्वासन दिले जात आहे. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु नागरिकांची उत्सुकता वाढत चाललेली आहे.

हे पण वाचा | Vivo V50 लवकरच होणार भारतामध्ये लॉन्च, किंमत आणि फीचर्स पाहून तुम्ही आनंदाने उड्या मारू लागताल

नविन Ola S1 PRO GEN 3 स्कूटर का खास आहे ?

ही स्कूटर इतर ई स्कूटरच्या तुलनेत अधिक कार्यक्षम आणि टिकाऊ बनवण्यात आलेली आहे. नवीन मल्टी कोर प्रोसेसर वापरण्यात आलेला आहे. ज्यामुळे स्कूटरचा मायलेज आणि परफॉर्मन्स सुधारला आहे. याशिवाय, नवीन प्लॅटफॉर्म डिझाईन आणि कंपनीच्या भविष्यातील इलेक्ट्रिक स्कूटर साठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे ओला इलेक्ट्रिक लवकरच अधिक नवीन मॉडेल बाजारात आणू शकते.

Ola S1 Pro Gen 3 स्कूटरने भारतातील ई – स्कूटर बाजारात नवीन दिशा दिली आहे. सुधारित इंजिनिअरिंग, उन्नत बॅटरी टेक्नॉलॉजी आणि हलक्या वजनाच्या फ्रेममुळे ही स्कूटर अधिक कार्यक्षम ठरणार आहे. आता ग्राहकांच्या प्रतिक्रिया कशा येतात आणि ओला Roadster मोटर सायकलची डिलिव्हरी कधी सुरू होईल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!