१ ऑगस्टपासून या नियमात होणार बदल! याचा तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम..


New Rules Updates: 1 ऑगस्ट 2025 पासून देशात अनेक मोठे बदल होत आहेत. जे तुमच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारावर थेट परिणाम करू शकतात. तुमच्या खर्चाचे गणिते या बदलामुळे काही प्रमाणात बदलू शकतात. तुम्ही नियमितपणे यूपीआय वापरत असाल एसबीआय चे क्रेडिट कार्ड वापरत असाल किंवा दर महिन्याला गॅस सिलेंडरच्या किमतीची वाट पाहत असाल तर हे बदल तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. हे बदल नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि सरकारी तेल कंपन्यांद्वारे नवीन दर जाहीर केले जाणार आहेत. चला तर जाणून घेऊया कोणते आहेत हे नवीन नियम ज्यामुळे तुमच्या खिशावर परिणाम होऊ शकतो.

UPI वापरकर्त्यांसाठी नवीन नियम

UPI वापरकर्त्यांसाठी काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. सध्या तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरची लिंक असलेल्या बँक खात्यातील शिल्लक दिवसातून फक्त २५ वेळा तपासू शकतात. आता एक ऑगस्टपासून हि मर्यादा वाढून 50 वेळा केला जाणार आहे. यामुळे वारंवार बँक बॅलन्स तपासण्यासाठी एक मोठी सोय उपलब्ध करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त OTP आधारित व्यवहारांसाठी आता वेळेची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. आता असे व्यवहार फक्त तीन निश्चित वेळेतच पूर्ण करता येणार आहेत.

  • सकाळी दहा वाजण्यापूर्वी
  • दुपारी एक ते संध्याकाळी पाच
  • रात्री साडेनऊ नंतर

हे बदल NPCL ने जाहीर केले आहेत आणि ते तुमच्या डिजिटल व्यवहारांना अधिक सुरक्षित आणि नियंत्रित बनवण्यासाठी फायद्याचे ठरणार आहेत.

हे पण वाचा| आयुष्मान कार्डाच्या नियमात मोठा बदल! आता ‘या’ आजारांवर खाजगी रुग्णालयात मोफत उपचार मिळणार नाही..

SBI क्रेडीट कार्ड साठी नवीन नियम

जर तुम्ही एसबीआयचे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर एक ऑगस्टपासून तुम्हाला एक मोठा धक्का बसणार आहे. एसबीआय नेत्यांच्या अनेक ELITE आणि PRIME कार्ड वर उपलब्ध असलेले मोफत विमान अपघात विमा संरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी या कार्ड्सवर 50 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतचा विमा संरक्षण दिला जात होता. परंतु आता एक ऑगस्टपासून सुविधा उपलब्ध नसणार आहे. SBI–UCO, सेंट्रल बँक, करून वैश्य बँक आणि PSB च्या कोणत्याही बँकेचे कार्ड वापरत असाल तर विमा संरक्षण साठी इतर पर्याय शोधावे लागतील. New Rules Updates

एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल

दर महिन्याच्या पहिल्या दिवशी घरगुती आणि व्यवसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल होत असतो. यावेळी एक ऑगस्ट रोजी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये काहीतरी बदल होण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर साठ रुपयांनी स्वस्त झाले होते परंतु घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झाला नव्हता. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर वर घसरण होऊन ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जर किमती कमी झाल्या तर महागाईने त्रस्त असलेल्या लोकांना मोठा दिलासा मिळेल. मात्र जर किमतीत वाढ झाली तर सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा परिणाम होईल.

CNG आणि PNG च्या किमतीमध्ये बदल होऊ शकतो

पेट्रोलियम कंपन्या सहसा महिन्याच्या पहिल्या दिवशी CNG आणि PNG च्या किमतीमध्ये बदल करतात. जरी गेल्या काही महिन्यापासून किमती स्थिर असल्या तरी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवशी यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर तुम्ही CNG वाहन वापर करत असाल किंवा तुमच्या घरी PNG कनेक्शन असेल तर एक ऑगस्ट पासून या किमतीमध्ये वाढ होऊ शकते किंवा घसरण देखील होऊ शकते.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!