1 मे पासून हे पाच नवीन नियम होणार लागू, सर्वसामान्यांच्या जीवनावर होणार परिणाम

New rules from May 1: एक मे पासून तुमचे दैनंदिन व्यवहारात मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. बँक व्यवहार पासून ते रेल्वे प्रवासापर्यंत अनेक नियम बदलणार आहे. ज्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर आणि जीवनशैलीवर होणार आहे. त्यामुळे या नवीन निर्णय बाबत जाणून घेणे गरजेचे आहे.  New rules from May 1

ATM व्यवहार महागणार

रिजर्व बँकेचे नव्या नियमानुसार, एक मे पासून एटीएम मधून पैसे काढणे, जमा करणे किंवा बॅलन्स तपासण्या अधिक माहाग होणार आहे. फ्री लिमिट ओलांडल्यावर, पैसे काढण्यावर प्रत्येक व्यवहाराला ₹ 19 शुल्क आकारला जाईल, जे आधी ₹17 होतं. तसंच बँकेचे बॅलन्स चेक केल्यावरही आता सात रुपये शुल्क लागणार आहे त्यामुळे येथे वापरताना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.

रेल्वे तिकिटांमध्ये मोठा बदल

रेल्वे प्रवास करण्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. एक मे पासून, स्लीपर किंवा एसी डब्यांसाठी वेटिंग तिकीट आता वैद्य राहणार नाही. वेटिंग तिकिटा धारकांना फक्त सामान्य डब्यांमध्ये प्रवास करता येईल. याशिवाय आगाऊ आरक्षणाचा कालावधी 120 दिवसावर 60 दिवसांवर आणण्यात आला आहे. रेल्वे भाड्यात ही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल

प्रत्येक महिन्यांच्या पहिल्या तारखेला एलपीजी सेंटरच्या किमतीत बदल होत असतो. यंदा 01 मे रोजी ही सेंटरच्या किमतीत वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे. गॅस सिलेंडर महाग झाल्यास स्वयंपाक घराचा खर्चही वाढणार आहे.

FD आणि बचत खात्यावरील परिणाम

बँकेच्या एफडी आणि बचत खात्यांच्या नियमात एक मे पासून बदल होणार आहे. नवीन व्याजदर जाहीर होण्याची शक्यता आहे, मात्र अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आणि खातेदारांनी या बदलाकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

आर आर बी बँकेचे विलीनीकरण

देशातील 11 राज्यातील प्रादेशिक ग्रामीण बँकेचे विलीनीकरण एक मी पासून लागू होणार आहे. एक राज्य, एक आर आर बी, या संकल्पने अंतर्गत, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, गुजरात, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिसा आणि राजस्थानी या राज्यांमध्ये हा मोठा बदल घडणार आहे. यामुळे बँकिंग सेवांना गतिमानाने प्रभावी व्यापार होईल

या सर्व बदलांचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या खिशावरती होणार आहे. त्यामुळे एक मे पासून लागू होणाऱ्या नवीन नियमांची माहिती घेणे आणि त्यानुसार तयारी करणे अत्यंत महत्त्वाचा आहे.

हे पण वाचा | Gold Price Update | मोठी बातमी आली समोर; सोन लवकरच जाणार एक लाखांच्या वर? वाचा सविस्तर माहिती

Leave a Comment

error: Content is protected !!