New Gold Rates : खरेदीदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. सोन्याच्या दरामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने नागरिकांचे टेन्शन वाढत चाललेले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्यामध्ये मोठे बदल पहायला मिळालेले आहेत. अवघ्या 36 दिवसांमध्ये सोन्याच्या किमतीत तब्बल ₹7,400 रुपयांची वाढ झालेली आहे. केंद्र सरकारने अलीकडेच अर्थसंकल्प जाहीर केलेला आहे. या अर्थसंकल्पनामध्ये सोने आणि चांदीवरील आयत शुल्क कमी करण्याची घोषणा केली होती, त्यामुळे सोन्याचे दर कमी होतील अशी अपेक्षा होती. मात्र, असे कुठेही दिसत नाही सोन्याच्या दरात मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे. New Gold Rates
सोन्याच्या किमतीतील वाढीचे कारणे
बाजार तज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, चलन वाढ जागतिक आर्थिक परिस्थिती आणि गुंतवणूकदाराचा वाढता कल, यामुळे सोन्याच्या किमतीमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. यावर्षी जानेवारी महिन्यामध्ये सोन्याच्या दरात सहा टक्के पेक्षा अधिक वाढ झालेली आहे तर फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तीन टक्क्यांनी वाढ झालेली आहे.
हे पण वाचा | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत शासनाचा मोठा निर्णय! नवीन GR समोर
सोन्याने शेअर मार्केटला टाकले मागे!
चालू आर्थिक वर्षामध्ये सोन्याच्या किमतीत जवळपास 17 हजार रुपयांची वाढ झालेली आहे. याचा अर्थ असा की, जर ही वाढ अशीच कायम राहिली, इतर वर्षा अखेरपर्यंत सोन्याचा दर 85,500 रुपये पेक्षा अधिक ग्राम पर्यंत पोहोचू शकतो. तज्ञांच्या मते यामुळे सोन्याच्या गुंतवणूकदारांना तब्बल 28% परतावा मिळणार आहे. विशेष म्हणजे शेअर मार्केटच्या तुलनेने सोन्याने अधिक चांगला परतावा दिलेला आहे.
36 दिवसात 10 टक्के वाढ – सध्याच्या किमती काय आहेत?
देशातील मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सोन्याच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळालेली आहे. 2024 च्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी सोन्याचा भाव 77,456 रुपये प्रति दहा ग्रॅम होता. मात्र, 5 जानेवारी 2025 रोजी हा दर 84,894 रुपयावरील पोहोचला. यामुळे अवघ्या 36 दिवसांमध्ये सोन्याची किंमत दहा टक्क्यांनी वाढली आहे.
आज, 6 गुरुवारी 2025 रोजी दर स्थिर होते. सकाळी सोन्याच्या दर 84,894 रुपये प्रति दहा ग्रॅम होता, तर दुपारी हा दर 84,533 रुपये झालेला आहे. दिवसाच्या सुरुवातीला 84,700 रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.
सोन्याच्या किमतीत पुढे किती वाढ होऊ शकते?
बाजार तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांमध्ये सोन्याच्या किमती आणखी वाढू शकतात. जर सोन्याचा दर 85 हजार रुपयांच्या पुढे गेला, तर गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणावर ती नफा होणार आहे. त्यामुळे किमती काहीशी खाली येऊ शकता. मात्र काही विशेषकांच्या मते आर्थिक वर्षाच्या अखेरीस सोन्याचा दर 86,500 रुपये प्रति दहा ग्राम पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
सोन्यात गुंतवणूक करावी का?
सोन्यामध्ये गुंतवणूक करणे नेहमी सुरक्षित मानले जाते. वाढत्या महागाईच्या काळात सोन्याचा दर वाढण्याची शक्यता आहे. मात्र, अल्पकालीन नफा बुकिंग मुळे किमतीत काही प्रमाणात चर-उतार होऊ शकतात. त्यामुळे गुंतवणूकदारांनी दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून निर्णय घ्यावा.
सोन्यामध्ये गुंतवणूक करावी का?
सोन्यामध्ये गुंतवणूक करणे नेहमीच सुरक्षित आहे. वाढत्या महागाईच्या काळात सोन्याचा दर वाढण्याची शक्यता जास्त असते. मात्र, अल्पकालीन नफा बुकिंगमुळे किमतीत काही प्रमाणात चढ-उतार होऊ शकतात. मुळे गुंतवणूकदारांनी दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून निर्णय घ्यावा.
निष्कर्ष
सोन्याच्या किमतीमध्ये सध्या विक्रमी पातळीवरती आहेत पुढील काही महिन्यांमध्ये त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना बाजाराच्या स्थितीचा आढावा घेऊन योग्य वेळी गुंतवणूक करावी. सरकारी धोरणे आणि जागतिक घडामोडीवर सोन्याच्या किमती किती वाढतील हे ठरणार आहे.
1 thought on “सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ! ₹7,400 रुपयांची वाढ! जाणून घ्यायचे नवीन”