Namo Shetkari Yojana News: शेतकरी असाल तर ही बातमी नक्की वाचा! शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या नमो शेतकरी योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आलेले आहे. निवडणुकीआधी मोठे मोठे आश्वासन देणाऱ्या सरकारकडून शेतकऱ्यांसाठी एक मोठा धक्कादायक निर्णय घेण्यात आलेला आहे. महायुती सरकारने “नमो शेतकरी महा सन्मान” योजना दरवर्षी 3000 रुपये वाढ करण्याचा आश्वासन दिलं होतं, पण आता या वाढ करण्याला स्थगिती देण्यात आलेली आहे. या ऐवजी सरकार शेतकऱ्यांना शेतीसाठी भांडवल गुंतवणूक कडे वळणाचा निर्णय घेतला आहे.
सरकारच्या उच्चपदी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच वर्षात शेतीसाठी तब्बल पंचवीस हजार रुपये कोटींची गुंतवणूक करण्याचा विचार सरकार करत आहे. यामुळे नमो शेतकरी महा सन्मान योजनेतील वाढ रद्द करण्यात आलेली आहे. त्याचा थेट परिणाम राज्यातील लाखो शेतकऱ्यांवरती होणार आहे. परंतु असा प्रश्न पडतो की नमो शेतकरी योजना चा हप्ता मिळणार का? परंतु सरकारने फक्त रक्कम वाढीला स्थगिती दिलेली आहे योजनेला नाही हे देखील जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. Namo Shetkari Yojana News
राज्यामध्ये जवळपास या योजनेत 93 लाख 53 हजार अधिक शेतकरी पात्र आहेत. शेतकरी पीएम किसान योजनेत पात्र असून सरकारकडून यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ दिला जातो. 100 ते मारुती या कालावधीमध्ये 93 लाख पंचवीस हजार 74 शेतकऱ्यांच्या खात्यावरती या योजनेचा लाभ जमा करण्यात आलेला आहे. पण पुढचा हप्ता वाढीव रक्कम मिळणार काही आता स्पष्ट झालेला आहे.
एक रुपयात पिक विमा या योजनेमुळे सरकारने दोन वर्षात विमा कंपन्यांना तब्येत 6000 कोटी रुपये अतिरिक्त दिलेले आहेत. त्यामुळे सरकारने निधीची दिशा बदलली असून भांडवली गुंतवणुकीकडे वळण्याचा निर्णय घेतलेला आहे. अर्थसंकल्पात शेतीसाठी 9000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे त्यातील बहुतांश निधी केंद्र पुरस्कृत योजनेमध्ये खर्च होतं. त्यामुळे राज्यस्तरीय योजनेसाठी फारसा निधी उरत नाही.
मोठ्या बदलामुळे कृषी विभागामध्ये नाराजीचे वातावरण आहे. कृषि मंत्री मानिकराव कोकाटे यांनी या निर्णयावर असमाधान व्यक्त केला आहे. “शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सध्याच्या निधीचा फारसा उपयोग होत नाही, ही आमच्या लक्षात आलेला आहे. त्यामुळे श्वास्वच्छ शेतीसाठी अधिक प्रभावी भांडवली गुंतवणूक करण्यावर आम्ही भर देणार आहोत,”असं त्यांनी स्पष्ट केलेले आहे.
राज्य सरकारने आता भांडवली गुंतवणुकीसाठी पुरवणी मागण्या द्वारे निधी मिळवण्याच्या तयारीत आहे. जूनच्या अखेरीस अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधी सरकारच्या या यू टर्न मुळे शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणाऱ्या योजनेमध्ये सध्या अस्थिरता पाहायला मिळत असून, निवडणुकीपूर्वी दिलेले अशोक क्षण मागे घेतले जात आहे. तर दुसरीकडे थेट भांडवली गुंतवणुकीचा पर्याय पुढे केला जातोय. पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना किती आणि कसा फायदा होईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हे पण वाचा | Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार? आली मोठी अपडेट समोर