Namo Shetkari Yojana: आता शेतकऱ्यांना मिळणार, वाढीव रक्कम, वाचा सविस्तर माहिती

Namo Shetkari Yojana : शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहेत त्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक लाभ होताना पाहायला मिळत आहे. अलीकडेच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 19 व्या हप्त्याची रक्कम जमा झालेली आहे. याच पार्श्वभूमी वरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी एक महत्त्वाची बातमी दिलेली आहे राज्य सरकारांतर्गत राबवण्यात येणाऱ्या नमो शेतकरी सन्माननिधी योजनेमध्ये वाढ होणार आहे. आता शेतकऱ्यांना 12 हजार रुपये ऐवजी 15000 रुपये होणार आहेत म्हणजे आता नमो शेतकरी योजनेच्या रकमेत वाढ होणार आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का हे बारा हजार रुपये कसे मिळतात. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती. Namo Shetkari Yojana

शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. कधी शेतकऱ्यांना आर्थिक धीर देण्यासाठी शेतकरी कर्जमाफी तर शेतकऱ्यांना खते बियाणे व त्यांना आर्थिक स्थिरता देण्यासाठी पीएम किसान व नमो शेतकरी यासारखा योजना राबवल्या जातात. सरकारच्या पीएम किसान योजनेअंतर्गत ₹6000/- रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते. योजनेचा पार्श्वभूमी वरती राज्य सरकारने एक महत्त्वकांशी योजना राबवली. ती म्हणजे नमो शेतकरी योजना या योजनेअंतर्गत पीएम किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी ₹6000/- रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मदत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येते. या दोन्ही योजनेची मिळून शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

राज्य शासनाने नमो शेतकरी योजनेच्या लाभ मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यांना 6000 रुपयांवरून लवकरच आता अर्थसहाय आणखी तीन हजार रुपये वाढणार असल्याची घोषणा देवेंद्र फडवणीस यांनी केली. मुळे शेतकऱ्यांमध्ये आता आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

हे पण वाचा | नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तारीख जाहीर! या तारखेला जमा केला जाऊ शकतात ₹2000 हजार रुपये?

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहार मधून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याचे वितरण झाले. शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट पैसे जमा करण्यात आले, त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी नमो शेतकरी योजनेच्या रकमेत वाढ होणार असे सांगितल्यामुळे, शेतकऱ्यांमध्ये आता आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता शेतकऱ्यांना वार्षिक पंधरा हजार रुपयांचे आर्थिक मदत मिळणार आहे. नक्कीच या मदतीचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. त्यांना त्यांच्या शेती निगडित कामांमध्ये ही आर्थिक मदतीचा फायदा होणार आहे.

केंद्र सरकार वर्षाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सहा हजार रुपये जमा करते तर राज्य शासनाच्या वतीने नमो शेतकरी किसान योजनेद्वारे करायला वार्षिक काठी सहा हजार रुपयांच्या आर्थिक मदत देण्यात येते. आता राज्य शासन या निधीमध्ये आणखी तीन हजार रुपयांची वाढ करणार आहे ज्याद्वारे ही रक्कम 9000 रुपये होणार आहे आणि शासनाचे सहा हजार रुपये असे मिळून शेतकऱ्यांना वर्षाला 15000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.

1 thought on “Namo Shetkari Yojana: आता शेतकऱ्यांना मिळणार, वाढीव रक्कम, वाचा सविस्तर माहिती”

Leave a Comment

error: Content is protected !!